हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधार कार्ड मोफत अपडेट (Free Aadhaar Update) करण्याबाबत सरकारने मोठी घोषणा केली आहे. UIDAI ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढवली आहे. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत उद्या 14 जून 2024 रोजी संपत होती मात्र आता ती वाढवून 14 सप्टेंबर 2024 करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी अपडेट केल नाही त्यांच्यासाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. महत्वाच म्हणजे यापूर्वी सुद्धा आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवण्यात आली होती.
UIDAI ने दिली माहिती
आधार जारी करणारी संस्था, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार ज्या ग्राहकांनी आधार कार्ड अपडेट केलेलं नाही ते वापरकर्ते 14 सप्टेंबर 2024 पर्यंत आधार अपडेट मोफत मिळवू शकतात. आधार कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र मानले जाते. यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे नाव, लिंग, पत्ता, वय आणि बायोमेट्रिक माहिती इत्यादी माहिती असते. आधार कार्ड असेल तरच तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेता येतो. तसेच प्रवास तिकीट बुकिंग आणि बँकेसंदर्भात काही कामे, शिक्षण इत्यादी सर्व गोष्टींसाठी आधार कार्ड महत्वपूर्ण ठरत. जातो.
कोणाला आहे अपडेटची गरज– Free Aadhaar Update
त्यांचे आधार 10 वर्षे किंवा त्याहून जुने आहे अशा वापरकर्त्यांना लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करायचे आहे. डेमोग्राफिक तपशील अपडेट करण्यासाठी, तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. आधार अपडेट करण्याची सुविधा मोफत उपलब्ध आहे. मात्र आधार केंद्रावर जाऊन तपशील अपडेट करण्यासाठी (Free Aadhaar Update) तुम्हाला शुल्क भरावे लागेल.
आधारकार्ड अपडेट कस कराल ?
सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in/ ला भेट द्या.
तुमच्या मोबाईल नंबरच्या मदतीने येथे OTP टाकून लॉगिन करा.
आता तुमचे सर्व डिटेल्स तपासा.
जर तुम्हाला तपशील बदलायचा असेल, तर तो पर्याय निवडा.
पुढे जा आणि तो तपशील दुरुस्त करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज पुरावा अपलोड करा.
यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला 14 अंकी URN नंबर मिळेल ज्याद्वारे तुम्ही आधार अपडेट प्रक्रियेचा स्टेट्स चेक करू शकता.