हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील शेतकऱ्यांबाबत नेहमीच नवनवीन योजना सरकारकडून आणल्या जातात. यामुळे शेतकऱ्यांना देखील याचा खूप जास्त फायदा होतो. अशातच आता राज्यातील 7.5 अश्वशक्ति पर्यंतच्या कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष मोफत वीज देण्याचा शासन जीआर देखील काढण्यात आलेला आहे. हा जीआर 25 जुलै 2024 रोजी गुरुवारी काढण्यात आलेला आहे. एप्रिल 2024 ते 2019 मार्च यादरम्यान ही योजना लागू राहणार आहे.
44 लाख 3 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे
ही योजना आता चालू झाल्यानंतर पुढील तीन वर्षे चालू राहणार आहे. आणि नंतर तिचा आढावा घेतल्यानंतरच पुढील कालावधीत ही योजना राबवण्याचा निर्णय सरकारकडून घेतण्यात येणार आहे. असे देखील जीआरमध्ये म्हटलेले आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज मोफत मिळावी. यासाठी मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केलेली आहे.
कृषी पंपाच्या बिलाच्या वसुलीची चिंता महावितरणाला नेहमीच असते. त्यामुळे आता या वीज बिलाचे 14 हजार 760 कोटी रुपये हे सरकार आता महावितरणाला देणार आहे. त्यामुळे महावितरणाला कोणत्याही प्रकारची चिंता राहणार नाही. कृषी पंप विज दिलाची एकूण थकबाकी ही 50000 कोटी रुपये एवढी आहे.
या योजनेअंतर्गत राज्य सरकार महावितरणाला दरवर्षी 14,760 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. राज्यामध्ये एकूण 47 हजार 41 लाख कृषी पंप ग्राहक शेतकरी आहेत. त्यामुळे एकूण वीज ग्राहकांच्या तुलनेत हे प्रमाण 16% एवढे आहे. कृषी ग्राहक सध्या एकूण 39 हजार 246 दशलक्ष युनिट वार्षिक वीज वापरतात. त्यामुळे राज्यात कृषी पंप रात्री 8 ते 10 तास किंवा दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जातो.