Free Higher Education | मोठी बातमी!! 2024-25 शैक्षणिक वर्षापासून मुलींना उच्चशिक्षण मोफत मिळणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता राज्यभरातील 20 लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून मोफत शिक्षण मिळणार आहे. या शिक्षणामध्ये अभियांत्रिकी, मेडिकल तसेच फार्मसीसह तब्बल 642 कोर्सेसचा समावेश आहे. यासाठी राज्य शासन दरवर्षी 1800 कोटी रुपये खर्च करणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2024- 25 पासून होणार आहे.

आपला देश कितीही प्रगतशील झाला असला, तरी अनेकवेळा मुलींना घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे त्यांना उच्च शिक्षण घेता यावे आणि मुलींनी त्यांच्या करिअरमध्ये पुढे जावे. यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार उच्च शिक्षणातील तब्बल 642 कोर्सेसचे शुल्क शासनामार्फत भरले जाणार आहे.

मुलींची शिक्षणातील टक्केवारी वाढावी. त्याचप्रमाणे उच्च शिक्षण परवडत नाही, म्हणून मुलींचा विवाह करून देणे हा प्रकार थांबावा. त्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. जवळपास 20 लाख मुलींना याचा फायदा होणार आहे.

राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या जवळपास 20 लाख मुलींना 642 कोर्सेस पूर्णपणे मोफत देण्याची सुविधा सरकार करणार आहे. या कोर्सेसची अर्धी सध्या शासनाच्या माध्यमातून भरली जाते. परंतु आता पूर्णपणे ही फी सरकारच भरणार आहे. यासंबंधीचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या उपसमितीत झाला आहे. आता कॅबिनेटमध्ये यांनी त्यावर अंतिम निर्णय घेण्यात असून लोकसभेची आचारसंहिता संपल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय होणार आहे.