हॅलो महाराष्ट्र | गावाकडे शाळेत किंवा महाविद्यालयात विद्यार्थी जाताना त्यांना खूप लांबून जावे लागते. अशावेळी गाडीने त्यांचा खर्च देखील खूप होतो. परंतु आता या विद्यार्थ्यांना याचे टेन्शन राहणार नाही. कारण आता यांना एसटीचे पास हे त्यांच्या शाळेमध्ये वितरित केले जाणार आहे. एसटी महामंडळाकडून या सूचना देखील देण्यात आलेला आहे. एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत.
नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी आता विद्यार्थ्यांना त्यांच्या एसटीच्या पासमध्ये 66% इतके सवलत देण्यात आलेली आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना केवळ 33 टक्के रक्कम भरावी लागेल. आणि त्यातून त्यांना महिन्याभराचा पास काढून मिळेल. त्याचप्रमाणे अशीच पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर या योजनेअंतर्गत 12 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत एसटी पासचे वितरण देखील करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन हे पास घ्यावे लागतील.
विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबवली
यासंदर्भात आता 18 जून पासून एसटीचे पास थेट तुमच्या शाळेत तुम्हाला देण्यात येणार आहेत. ही एक विशेष मोहीम आता शासनाकडून राबवली जात आहे. त्यासाठी आता शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करायला सांगितलेले आहे. या योजनेचा लाभ आता राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे.
15 जूनपासून ‘एक राज्य एक गणवेश’
त्याचप्रमाणे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला आणि मुलींना मोफत गणवेश देण्यात देखील येणार आहे.आता एक राज्य एक गणवेश असणार आहे. म्हणजेच राज्यभरातील प्रत्येक इयत्तेतील मुलांचे गणवेश सारखेच असणार आहे. सरकारची ही देखील एक नवीन योजना आहे.