पवारांच्या वाढदिवसानिमित्त मोफत चहा आणि नाष्टा; कुठे सुरू आहे उपक्रम??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. शरद पवारांनी आज ८३ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कडून विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातच पवारांच्या एका कट्टर कार्यकर्त्याने पुण्यात चक्क मोफत चहाचे वाटप करण्याचा उपक्रम राबवला आहे ज्याची चर्चा पुण्यात जोरदार सुरु आहे.

प्रतीक होनराव असं या पवारांच्या समर्थकांचे नाव असून ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवडचे संघटक आहेत. पुण्यातील नारायणपेठ परिसरातील माईसाहेब गुळाचा चहा या शाखेवरती चहा आणि नाष्टयाचे उपक्रम राबवला आहे. या परिसरात अभ्यासिकांचे प्रमाण जास्त असल्याने त्या विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा अशी प्रतिक्रिया त्यांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केली.

गेल्या ३ पिड्यांपासून आम्ही शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहोत. आजोबानी पवार साहेबांच्या विचारणा धरून काम सुरु केलं आणि तोच वारसा आम्ही आत्तापर्यंत जपत आलोय. शरद पवार साहेब यांनी आजपर्यंत महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. यातील मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ हे नामकरण असो, किंवा महिलांना ५० % आरक्षण देण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात महिलांना पुरुषांबरोबर त्याच ताकदीने काम करत आहेत. यामागे पवार साहेबांचे धोरणच आहे असेही त्यांनी म्हंटल.