हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| क्रिकेट हंगाम जवळ येत असताना रिलायन्स जिओने क्रिकेटप्रेमींसाठी एक आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. 17 मार्च ते 31 मार्च 2025 दरम्यान 299 रुपये किंवा त्याहून अधिकच्या प्लॅनचा रिचार्ज करणाऱ्या नवीन Jio ग्राहकांना 4K मध्ये 90 दिवस मोफत JioHotstar स्ट्रीमिंग आणि घरगुती इंटरनेटसाठी JioFiber/AirFiber ची 50 दिवसांची ट्रायल मिळणार आहे.
मोफत 4K JioHotstar सबस्क्रिप्शन
Jio ग्राहकांना यंदाच्या क्रिकेट मोसमात कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 4K गुणवत्ता असलेले JioHotstar सदस्यत्व मिळणार आहे. यामुळे चाहते आपल्या टीव्ही किंवा मोबाईलवर थेट सामने स्पष्ट दर्जामध्ये पाहू शकतील. ही सेवा 22 मार्च 2025 पासून सुरू होईल आणि तब्बल 90 दिवसांसाठी उपलब्ध असेल.
50 दिवस मोफत इंटरनेट ट्रायल
घरगुती ग्राहकांसाठी देखील ही ऑफर मोठी संधी ठरणार आहे. कारण, JioFiber आणि AirFiber सेवांसाठी 50 दिवस मोफत चाचणी योजना देण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना 800+ टीव्ही चॅनेल, 11+ OTT अॅप्स आणि अमर्यादित हाय-स्पीड इंटरनेट वापरण्याची संधी मिळणार आहे.
कसा घ्याल या ऑफरचा लाभ?
- सध्याचे Jio ग्राहक 17 ते 31 मार्चदरम्यान 299 रुपये किंवा त्याहून अधिक (1.5GB/दिवस किंवा अधिक) डेटा प्लॅनसह रिचार्ज करू शकतात.
- नवीन ग्राहक याच कालावधीत Jio सिम खरेदी करून याच प्लॅनसह सक्रिय करू शकतात.
- जे ग्राहक 17 मार्चपूर्वी रिचार्ज करतील, त्यांनी 100 रुपयांचा अतिरिक्त पॅक घेऊन या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
- एकदा रिचार्ज केल्यानंतर, 22 मार्च रोजी JioHotstar सबस्क्रिप्शन आपोआप सक्रिय होईल आणि ते पुढील 90 दिवस उपलब्ध राहील.
बजेट डेटा प्लॅनसह जिओची नवीन घोषणा
- 100 रुपयांचा प्लॅन – 5GB हाय-स्पीड डेटा + 90 दिवस JioHotstar
- 195 रुपयांचा प्लॅन – 15GB हाय-स्पीड डेटा + 90 दिवस JioHotstar
दरम्यान, रिलायन्स जिओची ही ऑफर म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीय ठरणार आहे. कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय प्रेक्षकांना हाय-क्वालिटी स्ट्रीमिंगचा अनुभव घेता येणार आहे. याशिवाय, JioFiber ट्रायलमुळे घरगुती ग्राहकांना उत्कृष्ट इंटरनेट सुविधा मिळणार आहे. जर तुम्हाला यंदाचा क्रिकेट हंगाम 4K मध्ये एन्जॉय करायचा असेल तर 17 मार्च ते 31 मार्च दरम्यान Jio चे 299 रुपये किंवा त्याहून अधिकचे रिचार्ज नक्की करा.