डॉक्टर नसल्याचे कारण देत बेल एअरमध्ये पेशंटला प्रवेश नाकारला; अत्यवस्थ पेशंटच्या मृत्यूला जबाबदार कोण??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सोमवारी रात्री अत्यवस्थ वाटणाऱ्या गोडवली, (ता.महाबळेश्वर) येथील नितीन भालेराव वय ४५ या सिक्युरिटी गार्डला बेलएअर हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकांनी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत प्रवेश नाकारल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जात आहे. गोडवली, ता.महाबळेश्वर येथील एका शाळेच्या सुरक्षा गार्ड अस्वस्थ वाटत असल्याने सोमवारी रात्री १० च्या सुमारास नातेवाईकांनी बेलअर हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु गेटवरील सुरक्षारक्षकांनी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत गेटमध्ये प्रवेश नाकारला. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता सदर डॉक्टरांनी त्यांना वाईला जाण्यास सांगितले.

सदर पेशंटला वाई येथील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता नेण्यात आले. उपचार करण्याआधी कोव्हिड टेस्ट करण्यासही सांगण्यात आले. त्यानंतर सदर पेशंटला वाई येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी तपासणी करुन पेशंट मृत झाल्याचं घोषित केलं.

दुर्गम भागातील रुग्णांवर उपचारासाठी पाचगणीमध्ये बेलएअर हॉस्पिटल काम करतं. यामुळे सर्वसामान्य लोक रात्री अपरात्रीच्या वेळी याच हॉस्पिटलकडे धाव घेतात. आता तर शासनाने कोव्हिडसाठी हॉस्पिटल अधिग्रहण केलं असतानासुद्धा डॉक्टर उपलब्ध नसल्याचं उत्तर सुरक्षा रक्षकांनी कोणाच्या सांगण्यावरून उत्तर दिलं याची चौकशी होणं गरजेचं आहे. आज या व्यक्तीला वेळेवर उपचार न मिळाल्यानेच ही व्यक्ती मृत झाली असल्याचं निदर्शनास येत आहे.

शासनाने अधिग्रहित केलेल्या पाचगणी येथील बेल एअर हॉस्पिटलमधील कोव्हीड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना उपचार घेण्यासाठी १० हजार रुपये डिपॉझिट भरावे लागत असल्याने सर्वसामान्य व हातावर पोट असलेल्यांनी उपचारासाठी पैसे आणायचे कोठून हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Leave a Comment