भाजपशासित राज्यांप्रमाणे ठाकरे सरकारने महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा!- किरीट सोमय्या

मुंबई । महाराष्ट्रात ठाकरे सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (kirit Somayya) यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ (UP Yogi Adityanath Govt) सरकारने लव्ह जिहादविरोधात (Love Jihad) कायदा आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे. मध्य प्रदेशातील शिवराज सरकार (Shivraj Sinh Chauhan) देखील योगी सरकारच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या विचारात आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकारने (Thackeray Govt) लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा, असं मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्रात आम्ही लव्ह जिहाद होऊ देणार नाही. युपी सरकारने लव्ह जिहादवर कायदा आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे, त्यांचं आम्ही समर्थन करतो. यूपीसारखा कायदा महाराष्ट्रात लागू करावा यासाठी आम्ही विधानसभेत प्रस्ताव मांडू, असं किरीट सोमय्या म्हणाले.लव्ह जिहादवर बोलताना किरीट सोमय्या यांनी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “अस्लम शेख यांनी याकूब मेननच्या फाशीला विरोध केला होता, फेनेटीक इस्लामिकऑरगनाझेशन संघटनेचं समर्थन केलं होतं. मात्र आम्ही महाराष्ट्रात लव्ह जिहाद होऊ देणार नाही”, असं सोमय्या म्हणाले. (anti-love jihad law)

किरीट सोमय्या यांनी शिवसेनेलाही टार्गेट केलं. “सत्तेत आल्यानंतर शिवसेनेचा रंग बदलला. अस्लम शेख लव्ह जिहादवर जी भाषा बोलतात तीच भाषा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतात”, अशी टीका सोमय्यांनी केली. यूपी सरकारने केलेल्या कायद्यानुसार महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा. विधानसभेत आम्ही प्रस्ताव मांडणार असल्याचं देखील सोमय्या म्हणाले. (Kirit Somaiya demand enactment of anti-love jihad law in Maharashtra)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : http://www.hellomaharashtra.in

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com