‘जलयुक्त शिवार’ योजनेतील जनसहभागाचीही चौकशी करणार का?; चंद्रकांत पाटील यांचा सवाल

मुंबई । ‘जलयुक्त शिवाराचं काम पूर्ण होण्यासाठी मोठा जनसहभाग होता. गावागावात कामे झाली. आता या जनसहभागाचीही चौकशी करणार का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. (Chandrakant Patil on Jalyukt shivar scheme SIT probe) ‘सरकार तुमचं आहे. तुम्ही दोषींवर कारवाई करू शकता. पण वस्तुस्थिती काय आहे हे पाहा, असंही पाटील यांनी म्हटलं. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना पाटील बोलत होते.

जलयुक्त शिवारमध्ये ९ हजार कोटी वापरले होते. परंतु पाण्याची पातळी वाढली नाही, अशीही माहिती उघड झाली आहे. याशिवाय, ‘कॅग’च्या अहवालातही जलयुक्त शिवार योजनेवर ताशेरे ओढण्यात आले होते. त्यामुळे राज्य सरकारकडून जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी ‘कॅग’च्या अहवालातील सर्व आरोप फेटाळून लावले.

जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणीसाठा वाढला की नाही, हे राज्यातील शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. या योजनेमुळे जमिनीखालील पाणीसाठी वाढला. त्यामुळे बोअरवेल आणि विहिरींमध्ये पाणी उपलब्ध झाले. परिणामी शेतकरी दोन-दोन पिकं घेऊ लागले होते, अनेक शेतकऱ्यांनी रब्बी पिके घेण्यासही सुरुवात केली. तर औरंगाबाद आणि जालना यासारख्या भागात लागणाऱ्या पाण्याच्या टँकर्सची संख्याही घटली होती.

मात्र, ‘कॅग’च्या अहवालात या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला नाही. जलयुक्त शिवार योजनेतंर्गत संपूर्ण राज्यभरात एकूम 6,41,560 कामे झाली. परंतु, ‘कॅग’कडून यापैकी फक्त 1128 कामंच तपासण्यात आली. ही टक्केवारी अवघी 0.17 टक्के इतकी आहे. एकूण 22589 गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना पोहोचली असताना केवळ 120 गावांच्या पाहणीवरून योजनेचे मूल्यमापन कसे काय होऊ शकते, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com