‘त्या’ भल्या पहाटेच्या शपथविधीवर राज्यपालांनी दिली प्रथमचं प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई । महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात तो भल्या पहाटेचा धक्कादायक शपथविधी महाराष्ट्राच्या जनतेच्या कायम लक्षात आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर रोज युद्ध पातळीवर चालणाऱ्या बैठकांकडे जनता डोळे लावून होती. मात्र, एक भल्या पहाटे साखर झोपेत असताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस शपथविधी घेत असल्याचा आवाज कानावर पडताच खडबडून जागी झालेल्या जनतेवर तोंडात बोट घालण्याची वेळ आली होती. हा शपथविधी पार पडल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका झाली होती. पहाटे शपथविधी घेतल्यामुळे राजकीय वर्तुळातून त्यांना लक्ष करण्यात आलं होतं. दरम्यान पहिल्यांदाच राज्यपालांनी यावर जाहीरपणे प्रतिक्रिया दिली आहे.

भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सूत्रे हाती घेतली त्याला ५ सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेणारे जन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या नावाने पुस्तक प्रकाशित करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सकाळी सकाळी शपथविधी उरकून घेतला त्यावरून आपल्यावर टीका झाली होती, त्याबद्दल आपणास काय वाटते असं विचारलं असता, “जर कुणी रामप्रहराला शपथ घेतली असेल, तर तुम्ही त्यावर प्रहार कशाला करता,” असा उलट सवाल केला. विधान परिषदेत राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या निवडीसाठी सरकारने नावे पाठविली नाहीत, सरकारच सुस्त आहे, टीका मात्र माझ्यावर होते असं सांगत भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारवर ठपका ठेवला. राज्य सरकारशी आपला कसलाही वाद नाही वा संघर्ष नाही, असं सांगायलाही ते यावेळी विसरले नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook