Power Cut in Mumbai: मुंबतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता- ऊर्जामंत्री नितीन राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उनगरातील वीजपुरवठा 12 ऑक्टोबरला पूर्णपणे खंडित झाला होता. या काळात अनेक महत्त्वाच्या सेवा कोलमडल्या. परंतु हा वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.सोमवारी मुंबई आणि शेजारच्या शहरांमधील वीज पुरवठा खंडित झाला होता. याचा मोठा परिणाम जनजीवनावर झाला. लोकल सेवा ठप्प झाली. सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल रात्री उशिरा एक ट्विट करत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

‘सोमवार दिनांक 12.10.20 रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही,’ असं ट्विट नितीन राऊत यांनी रात्री बाराच्या सुमारास केलं. त्यामुळे चर्चेला उधाण आलं. मुंबई आणि परिसरात घातपात घडवण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उनगरातील वीजपुरवठा 12 ऑक्टोबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास पूर्णपणे खंडित झाला होता. या काळात अनेक महत्त्वाच्या सेवा कोलमडल्या. लोकल ट्रेन, सिग्नल यंत्रणा ठप्प झाल्या. रुग्णालय, कोर्ट तसंचं ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला. यानंतर टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.परंतु जवळपास अडीच ते तीन तास संपूर्ण मुंबई आणि उपनगरं अंधारात गेल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. परंतु आता ऊर्जामंत्र्यांच्या ट्वीटमुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment