आमचं सरकार भक्कम; राज्यावर राजकीय संकट येणार नाही, आणि आलंच तर… मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात तीन पक्षांचं सरकार असलं तरी आमचा कारभार उत्तम चाललाय. तिन्ही पक्षांमध्ये आडमुठेपणा नाही, असं सांगतानाच राज्यावर राजकीय संकट येणार नाही. आणि राजकीय संकट आणणार असाल तर तसं होणारही नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. ठाकरे सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’ या आघाडी सरकारच्या कार्यपुस्तिकेचे आज प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं यावर अजूनही विश्वास बसत नाही. दोन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले. पण आमचं सरकार उत्तम चाललं आहे. जनतेचा आशीर्वाद आहे. तिन्ही पक्षात आडमुठेपणा नाही. तीन चाकांचं सरकार अशी आमच्यावर टीका करण्यात आली. पण हे सरकार केवळ तीन चाकांचं नाही. या सरकारला चौथं चाकही आहे. हे चौथं चाक जनतेच्या विश्वासाचं आहे. हा जगन्नाथाचा रथ आहे. जनता जनार्दनाचा रथ आहे. तो पुढेच धावेल, असंही ते म्हणाले. महाराष्ट्र कधी थांबला नाही, थांबणार नाही. महाराष्ट्र कधीही कुणाला घाबरला नाही आणि घाबरणारही नाही. माझं एक एक पाऊल मी दमदारपणे टाकणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. (Maharashtra government strong, stable says cm uddhav thackeray)

आमचं सरकार आल्यानंतर राज्यात संकटाची मालिका सुरू झाली. नैसर्गिक संकटातही काही लोकांनी राजकारण केलं. हे दुर्देवी आहे, अशी भाजपवर टीका करतानाच कोरोनाच्या काळात आम्ही कधी कोरोनाच्या आकड्यांची लपवाछपवी केली नाही. या संकटावरही आपण लवकरच मात करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment