‘हिंमत असेल तर धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन बघा’; विनायक मेटेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । “उद्धव ठाकरे यांच्या भाषणात फक्त पोकळ गप्पा होत्या. हे सरकार कुणालाही न्याय देऊ शकत नाही. तुमच्यात हिंमत असेल तर धनगर समाजाला, मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन बघा”, असं आव्हान शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेंटेनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. मात्र, त्यांच्या भाषणात निव्वळ पोकळ गप्पा होत्या, असंही ते म्हणाले.

“मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या भूमिकेबाबत मला शंका आहे. सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे पण ऐकत नाही. मग ऐकतंय तरी कुणाचं?”, असा सवालही मेंटेंनी सरकारला विचारला आहे.“अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी एकत्र सरकारविरोधात आवाज उठवला पाहिजे”, असंही ते म्हणाले. पुण्यात आज मराठा आरक्षण स्थगितीपूर्व नोकर भरती अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा ते बोलत होते (Vinayak Mete Criticize CM Uddhav Thackeray).

दरम्यान, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपर चौफेर टीका केली. मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक जण सरकार पाडण्याच्या मागे आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केला. तसेच हिम्मत असेल तर हे सरकार पाडून दाखवा असं आव्हानही त्यांनी विरोधकांना दिलं. त्यांनतर विरोधकांनाही ठाकरेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment