‘महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बुद्धू मुख्यमंत्री बसलाय!’; नारायण राणेंनी उडवली उद्धव ठाकरेंची टर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळाव्यात नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना बेडूक आणि बेडकाची पिल्ले, अशा अप्रत्यक्ष शब्दांत टोले लगावले होते. या टीकेला नारायण राणे यांनी सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत प्रत्युत्तर दिले. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चवताळून प्रहार केला.

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदावर बसण्याची लायकी नाही.मुख्यमंत्रीपदावर बसल्यापासून एकही काम यांनी नीट केलं नाही. यांना जीडीपी कळत नाही, अर्थव्यवस्था माहिती नाही. अधिकारी हसतात. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बुद्धू मुख्यमंत्री बसला आहे. माझे सर्व शब्द त्यांना सांगा, अशी घणाघाती टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

हे पिंजऱ्यातील वाघ आहेत का?
कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे पिंजऱ्यात होते. आत्ता कुठे एका दौऱ्याला ते बाहेर पडले. हे स्वतःला वाघ म्हणतात. हे पिंजऱ्यातील वाघ आहेत का? कालच्या सभेत केवळ 47 लोक टाळ्या वाजवायला होते. मी शिवसेनेत होतो, अनेक पदं भुषवली. बाळासाहेब ठाकरे यांनी मला अनेक पदं दिलं. मी बेडूक नव्हतो. हे बेडूक आहेत म्हणून त्यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं नाही. बाळासाहेब असते तर त्यांना मुख्यमंत्री केलं नसतं. ते जास्त बोलले तर 47 वर्षात जे केलं ते सर्व बाहेर काढेल, असंही राणे म्हणाले.

उद्धव ठाकरे तुम्ही शेळपट आहात
कुणाला दादागिरीची भाषा करता, कुणाला वाघाची भाषा करता? तुम्ही स्वत: शेळपट आहात. माझ्याकडे या शब्दाशिवाय दुसरा शब्द नाही तुमच्यासाठी. मराठी माणसासाठी शिवसेना आहे म्हणता मग मुख्यमंत्री झाल्यावर काय केलं तुम्ही त्यांच्यासाठी, असा प्रश्न राणेंनी उद्धव ठाकरेंना विचारला.

.. तर याद राखा!
उद्धव ठाकरेंनी कालच्या भाषेसारखी परत जर भाषा वापरली तर आम्ही मातोश्रीची आतली आणि बाहेरची माहिती देऊ. ती त्यांना महागात पडेल. बाळासाहेब ठाकरेंकडे पाहून अजून संयमाने गप्प बसलो आहे. आमच्याकडे नजर फिरवू नका. आम्ही नजर फिरवली तर कपडे सांभाळत पळता भुई थोडी होईल, असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment