पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीत 36 लाखांनी वाढ; आता ‘इतकी’ झाली संपत्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे. 30 जून 2020 ला मोदींच्या संपत्तीची एकूण किंमत 2.85 कोटी रुपये झाली आहे. 2019 च्या तुलनेत यंदा तब्बल 36 लाखांनी संपत्तीत वाढ झाली आहे. यामुळे आता पंतप्रधानांसह सर्व कॅबिनेट मंत्र्यांनाही संपत्तीचा लेखाजोखा जाहीर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. (pm narendra modi richer in this year but amit shah loses net worth)

पंतप्रधान मोदींची संपत्ती वाढली तरी कशी?
देशाची अर्थव्यवस्था खालावली असताना याशिवाय शेअर बाजारातही चढ-उतार असताना मोदींची संपत्ती कशी वाढली? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. खरंतर, पंतप्रधान मोदी यांची संपत्ती बँका आणि अनेक इतर सुरक्षित साधनांमध्ये गुंतवणूक झाल्यामुळे वाढली आहे. बँकांमधून त्यांना तब्बल 3.3 लाख परतावा मिळाला आहे तर इतर साधनांमधून 33 लाख रुपये मिळाले आहेत. मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती 2.49 कोटी रुपये होती.

बँक खात्यात इतकी आहे रोख रक्कम?
यंदाच्या जून महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान मोदी यांच्याकडे रोख रक्कम फक्त 31,450 रुपये होती. त्यांच्याकडे गांधी नगरमध्ये भारतीय स्टेट बँकेत NSC ब्रांचच्या SBI खात्यामध्ये 3,38,173 रुपये जमा आहेत. या खात्याच्या एफडीआर आणि एमओडीमध्ये त्यांचे 1,60,28,939 रुपये जमा आहेत. त्यांनी डाक विभागात नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC) मध्ये तब्बल 8,43,124 रुपये जमा केले आहेत. जीवन विमा पॉलिसीमध्ये 1,50,957 रुपये आणि टॅक्स सेव्हिंग्स इन्फ्रा बॉन्डमध्ये 20,000 रुपये लावले आहेत. अशा प्रकारे त्यांची एकूण जंगम मालमत्ता 1.75 कोटी रुपये आहे.

मोदींच्या नावावर एकही गाडी नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतंही कर्ज घेतलेलं नाही. त्यांच्याकडे त्यांच्या नावावर एकही गाडी किंवा इतर वाहन नाही. मोदींकडे तब्बल 45 ग्रॅम सोन्याच्या 4 अंगठ्या आहेत, ज्याची किंमत 1.5 लाख रुपये आहे. (pm narendra modi richer in this year but amit shah loses net worth)

मोदींच्या नावावर आहे इतकी स्थावर मालमत्ता?
मोदींकडे संयुक्त मालकीची गांधीनगरच्या सेक्टर-1 मध्ये तब्बल 3531 चौरस फुटांचा एक प्लॉट आहे. हा प्लॉट 4 लोकांच्या संयुक्त नावावर असून उर्वरित तिघांची 25-25 टक्के भागिदारी आहे. ही मालमत्ता 25 ऑक्टोबर 2002 ला खरेदी करण्यात आली होती. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होण्याच्या 2 महिने आधी याची किंमत फक्त 1.3 लाख रुपये होती. पण आता मोदींची एकूण स्थावर संपत्तीची किंमत 1.10 कोटींवर गेली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment