अरे येऊ देत! ईडीच्या नोटीसीची वाटचं पाहतोय? संजय राऊतांनी थोपटले दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ”मला अनेकांनी विचारलं ईडीची (ED) नोटीस आली का? सध्या आली नाही, पण आली तरी मला आश्चर्य वाटणार नाही” असं थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांना केलं आहे. ईडी उत्खनन करत मोहेंजोदारो आणि हडप्पापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे मला, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) किंवा महाविकास आघाडीतील आणखी प्रमुख नेत्यांना ईडीची नोटीस आली, तर धक्का बसणार नाही” असंही संजय राऊत म्हणाले.

“चौकशीला कोणीही घाबरत नाही, घाबरण्याचं कारणच नाही. आता तुम्ही चौकशांना घाबरायला पाहिजे. महाराष्ट्रातसुद्धा सत्ता आहे, हे लक्षात घ्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, हे विसरु नका. मला अनेकांनी विचारलं की तुम्हाला ईडीची नोटीस आली का? सध्या आली नाही, पण आली तरी मला आश्चर्य वाटणार नाही. मला, अजित पवारांना किंवा अन्य कोणालाही येऊ शकते. शरद पवारांना तर येऊनही गेली. मला असं कळलं की जुनी थडगी उकरण्याचा प्रयत्न, २०-२० वर्षांपूर्वीचं उत्खनन सध्या सुरु आहे. ईडीवाले मोहेंजोदारो हडप्पापर्यंत पोहोचले आहेत. काढू द्या, आम्हीही तयार आहोत” असं संजय राऊत म्हणाले.

“प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी स्वतः खुलासा केला आहे, की ज्या प्रकरणाचा तपास ईडी करत आहे, त्याच्याशी सरनाईक कुटुंबाचा काहीही संबंध नाही. मराठी माणसाने महाराष्ट्रात व्यापार उद्योग करणं, हा जर दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून त्यांना खतम करण्याचं धोरण कोणी राबवत असेल, तर हा मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय देऊन उभा राहील” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment