वाहतूक पोलीस महिलेची अभिमानास्पद कामगिरी ; हरवलेल्या चिमुकलीची आणि पालकांची करून दिली भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सकलेन मुलाणी । कराड सातारा

दीपावलीच्या खरेदीसाठी आई-वडिलांबरोबर आलेली पाच वर्षांची चिमुकली कराडच्या मुख्य बाजारपेठेत हरवली. त्यामुळे तिचे जोरात रडणे सुरु झाले. तर कावरेबावरे झालेले आई-वडील बाजारपेठेत तिचा शोध घेऊ लागले. चिमुकलीचे रडणे एकूण ड्युटीवर असणाऱ्या महिला पोलिसांनी तिला जवळ बोलून शांत केले. ती हरवली असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तिच्या आई-वडिलांचा शोध घेऊन चिमुकलीला त्यांच्या ताब्यात दिले. यामुळे वाहतक पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहर वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल मिथुन मोहन बोलके व महिला पोलीस कॉन्स्टेबल ज्योती सुनील कुर्हाडे हे दोघेजण शहरातील चावडी चौक परिसरात कर्तव्य बजावत होते. त्यावेळी बाजारपेठेतील गर्दीमध्ये 5 वर्षाची लहान मुलगी रडत असल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन ताच्याकडे आपुलकीने विचारपूस केली त्यावेळी ती आई-वडिलांपासून दुरावल्याचे पोलिसांच्या लक्षात आले त्यानंतर महिला पोलीस ज्योती कुराडे यांनी तिला खाऊ देऊन शांत केले. तर मिथुन बोलके हे संबंधित बालिकेच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी बाजारपेठेत फिरू लागले.

त्याचवेळी बाजारपेठेत एक पालक कावराबावरा होऊन फिरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांची मुलगी हरवल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर खात्री करून पोलिसांनी संबंधित बालिकेस पालकांच्या ताब्यात दिली. पोलिसांनी कर्तव्य बजावत असताना केलेल्या कामगिरीबद्दल डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी विजय गोडसे, त्यांच्यासह पोलिसांनी कॉन्स्टेबल बोलके व महिला कॉन्स्टेबल कुराडे यांचे अभिनंदन केले. दरम्यान, नागरिकांनी दिवाळीची खरेदी करत असताना लहान मुलांना बाजारपेठेत बरोबर घेऊन येऊ नये, तसेच खरेदीसाठी येत असताना मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. बाजारपेठेत आल्यानंतर सोशल डिस्टन्स पाळणेही गरजेचे आहे. महिलांनी आपल्या गळ्यातील दागिन्यांच्या अनुषंगाने सुरक्षितता बाळगावी. बाजारपेठेत एखादी व्यक्ती अथवा वस्तू संशयास्पद आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment