Fridge explosion reason : फ्रिजचा चुकीचा वापर बनू शकतो टाइम बॉम्ब! ‘ही’ चूक करू नका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Fridge explosion reason : उन्हाळा म्हणजे उष्णतेचा कहर आणि फ्रीजचा आधार. घरातलं शांत, गार आणि नित्यनेमाने वापरलं जाणारं उपकरण म्हणजे फ्रिज. पण किती जणांना माहिती आहे की चुकीच्या पद्धतीने ठेवलेला फ्रिज तुमच्या घरात स्फोटाचा धोका निर्माण करू शकतो?

होय, चुकीच्या पद्धतीने लावलेला फ्रिज म्हणजे तुमच्या घरातल्या भिंतीशी चिकटून उभा असलेला एक ‘साइलेंट थ्रेट’ ठरू (Fridge explosion reason) शकतो. या उष्णतेच्या दिवसांत योग्य अंतर न ठेवल्यास फ्रिजचा कंप्रेसर ओव्हरहिट होतो, आणि त्यामुळे ब्लास्ट होण्याचा गंभीर धोका निर्माण होतो.

फ्रिज आणि भिंत यामधील ‘जीवनरक्षक’ अंतर

फ्रिज आणि भिंत यामध्ये किमान 15 ते 20 इंचांचे अंतर ठेवणे अत्यावश्यक आहे. हे अंतर कंप्रेसरला पुरेशी हवा मिळवून देते, ज्यामुळे त्याचे तापमान नियंत्रणात राहते. यामुळे केवळ फ्रिज नीट चालतो असं नाही, तर तुम्ही आणि तुमचं कुटुंब एका संभाव्य दुर्घटनेपासून वाचू शकता.

उष्णता, व्हेंटिलेशन आणि फ्रिज

फ्रिज नेहमी अशा जागी ठेवावा जिथे सालस हवा खेळते. जेवढा व्हेंटिलेशन चांगला, तेवढा फ्रिज अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम. जर फ्रिज थेट उन्हात किंवा एसीच्या समोर ठेवला असेल, तर त्याचे परिणाम तितकेच घातक ठरू शकतात.

रिकामा फ्रिज म्हणजे धोका? (Fridge explosion reason)

बऱ्याच वेळा घरात कोणी नसल्यास, लोक फ्रिज चालू ठेवतात पण रिकामा ठेवतात. हा प्रकारही धोकादायक असू शकतो. कारण फ्रिजमध्ये जर काहीही नसल्यास आणि दरवाजा उघडला तर अचानक तयार झालेल्या वायूंचा दाब ब्लास्टला कारणीभूत ठरू शकतो.

‘फ्रिज सेफ्टी’साठी काही महत्त्वाचे नियम

  • भिंतीपासून किमान 1.5 फूट अंतर ठेवा
  • जुना फ्रिज वापरत असाल, तर त्याची वेळोवेळी तपासणी करा
  • व्हेंटिलेशनच्या जागीच फ्रिज ठेवा
  • फ्रीजचे वायरिंग आणि प्लग वेळोवेळी तपासून घ्या
  • फार काळ वापर नसेल तर फ्रिज बंद करा

फ्रिज तुमचा मित्र असतो पण त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यास तो संकटाचा स्रोत बनू शकतो. एक छोटीशी काळजी घ्या आणि तुमच्या कुटुंबाची मोठी सुरक्षितता करून घ्या.