औरंगाबादेत म्यूकरमायकोसिसचे भयावह रूप; तब्बल 115 जणांचा मृत्यू

0
35
mucormicosis
mucormicosis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : जिल्हायात कोरोना रुग्णांची संख्या जरी आटोक्यात आली असली तरी कोरोनापाठोपाठ म्यूकरमायकोसिसच्या (बुरशीजन्य) आजाराने फास आवळला असून, आजपर्यंत 115 रुग्णांचा बळी या आजाराने घेतला आहे.

अडीचशे रुग्णांवर शस्त्रक्रिया कारण्यात आल्या आहेत. बुधवारी नव्याने 13 रुग्ण आढलल्याने म्युकरमायकोसिसच्या आजाराच्या रुग्णांची संख्या 1007 इतकी झाली असून 611 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

281 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत घाटी रुग्णालयात 207, एमजीएम 189, एमआयटी 126, डॉ. हेडगेवार हॉस्पिटल 94, युनायटेड सिग्मा हॉस्पिटल 58, अपेक्स सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल 15 रुग्णांवार उपचार करण्यात आल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here