Thursday, March 30, 2023

कोविड – १९ वरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले, विचारले काय आहे ॲक्शन प्लॅन ?

- Advertisement -

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशातील कोविड -१९ बाबत स्वत: दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस पाठविली असून ४ विषयांवर राष्ट्रीय योजनेची माहिती मागितली आहे. शुक्रवारी सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ यावर सुनावणी घेणार आहे. कोरोना संसर्गाच्या स्थिती संबंधित देशाच्या विविध उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित केल्या आहेत.या प्रकरणात कोर्टाने हरीश साळवे यांना अ‍ॅमिकस क्युरी म्हणून नियुक्त केले आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने ज्या चार मुद्द्यांवरून सरकारकडे उत्तरे मागितली आहेत. त्यामध्ये देशातील ऑक्सिजन पुरवठा,महत्वाच्या औषधाचा पुरवठा, लसीकरणाच्या पद्धती आणि लॉकडाऊन यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की कोविड -१९ संबंधित मुद्द्यांवरील वेगवेगळ्या उच्च न्यायालयांची सुनावणी केल्यास एक प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ शकतो. लॉकडाऊन घोषित करण्यासाठी उच्च न्यायालयातील न्यायालयीन अधिकारांवरही विचार केला जाईल असेही कोर्टाने म्हटले आहे.