हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Fuel Control Switch । नुकतंच अहमदाबाद विमान अपघाताचे कारण स्पष्ट करणारा एक अहवाल समोर आला. या अहवालात असं म्हंटल गेलं आहे कि, उड्डाणानंतर काही सेकंदात दोन्ही इंजिनचे फ्यूएल स्विच बंद झाल्यामुळं इंजिनमध्ये इंधन पोहोचणं थांबलं. त्यामुळे विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि क्रॅश झाले. कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये, एका वैमानिकाला विचारताना ऐकू येते की त्याने कटऑफ का केला. दुसऱ्या वैमानिकाने मी कट ऑफ केलं नाही असं उत्तर दिले. दोन्ही वैमानिकांनी अथक प्रयत्न केले खरे, परंतु अपघात रोखण्यात त्यांना यश आलं नाही. परंतु विमानाचे इंजिन बंद करणारे फ्युएल कंट्रोल स्विच म्हणजे काय ? आणि ते कसे काम करते हे तुम्हाला माहितेय का? चला तर मग याबाबत सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊयात.
तर मित्रानो, फ्युएल कंट्रोल स्विच (Fuel Control Switch) हे विमानाच्या इंजिनाच्या सुरक्षित आणि कार्यक्षम ऑपरेशनसाठी अत्यंत महत्त्वाचे असते कारण ते हा स्विच इंजिनमध्ये जाणारं इंधन नियंत्रित करतो. म्हणजे इंधन चालू ठेवायचं की बंद करायचं, हे त्यावरून ठरतं. पायलट विमान जमिनीवर असताना इंजिन सुरू करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी किंवा उड्डाणादरम्यान इंजिनमध्ये बिघाड झाल्यास इंजिन मॅन्युअली थांबवण्यासाठी किंवा रिस्टार्ट करण्यासाठी त्यांचा वापर करतात. परंतु पायलट चुकूनही फ्यूएल स्विच बंद करू शकत नाही, कारण तो सहज किंवा चुकीने बंद होणारा नसतो. या स्विचेसच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या बाजूला ब्रॅकेट देण्यात आलेले असतात. याबरोबरच एक स्टॉप लॉक यंत्रणा देखील देण्यात आलेली असते जी वैमानिकांना स्विच त्याच्या RUN आणि CUTOFF अशा कोणत्याही एका स्थितीवरून दुसऱ्या स्थितीत हलवण्यापूर्वी ते उचलावे लागते.
कुठे असतो फ्युएल स्विच ? Fuel Control Switch
फ्युएल कंट्रोल स्विच सामान्यतः कॉकपिटमधील कंट्रोल पॅनलवर असते. याचे स्वरूप विमानाच्या प्रकारानुसार बदलू शकते, जसे की लीव्हर, बटण किंवा टॉगल स्विच… एअर इंडियाच्या बोईंग 787 विमानात दोन फ्यूएल कंट्रोल स्विच होते. हे दोन्ही स्विच विमानाच्या जीई इंजिन्सशी जोडलेले होते आणि ते थ्रस्ट लिव्हरच्या खाली बसवले होते. हा थ्रस्ट लिव्हर म्हणजे असा हँडल असतो, जो पायलट विमानाच्या इंजिनला किती पॉवर द्यायची हे ठरवण्यासाठी वापरला जातो. हा थ्रस्ट लिव्हर कॉकपिटमध्येच असतो. हा स्विच स्प्रिंगमुळे लॉक केलेला असतो, त्यामुळे तो सहज हलत नाही. वैमानिकाला हा स्विच जर तो चालू किंवा बंद करायचा असेल, तर आधी स्विच (Fuel Control Switch) थोडा वर उचलावा लागतो, आणि मगच तो ‘कट ऑफ’ किंवा ‘रन’ केला जाऊ शकतो.