पाटण तालुक्यातील 94 पाणी पुरवठा योजनांना निधी : खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील म्हावशी, जिंती, सडावाघापूर, चाफळ यासह एकूण ९४ गावातील पाणी पुरवठा योजनांना मंजूरी मिळालेली आहे. सदर गावातील पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध झाल्याने त्या कामांना गती मिळणार आहे. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठा व्हावा, यासाठी खा.श्रीनिवास पाटील यांच्याकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहे.

पाटण तालुक्यातील ९४ गावासाठी निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये सर्वात मोठी योजना असलेल्या म्हावशी येथे ४ कोटी २९ लक्ष रूपये मंजूर झाले आहेत. तसेच यासह केरळ (४४.७२ लक्ष रूपये), आंबळे (२४.९५ लक्ष रूपये) आंबवडे खुर्द (८०.११), असवलेवाडी (२२.५२), अंबवणे (३३.२४), बहुले (२४.२१), दिवशी बुद्रुक (४५.६७), कोरिवळे (५६.४९), टेळेवाडी (१४.९२), निसरे (९०.२५), बनपुरी (१९७.५१), चाळकेवाडी (१८.६३), चाफोली (२२.६२), चाफळ (१६३.२६), दाढोली (२९.८५), डांगिष्टेवाडी (१९.२६), धायटी (३१.५०), जुंगटी (३१.६७), गाढवखोप (२१.५६), गलमेवाडी (८३.३७), गमेवाडी (१६.०८), घाणव (३७.४७), गोषटवाडी (४०.८२), वाघणे (२४.७६), जिंती  (मोडकवाडी) (२२.४२), काहीर (५०.३०), कळकेवाडी (१५.९२), लोटलेवाडी – काळगाव (२२), येळेवाडी – काळगाव (२१.२४), बोपोली (२९.०८), ढाणकल (२९.२४), घाटमाथा (१७.२८), जिंती-सावंतवाडी (२२.३२), मणेरी (१९.१७), भरेवाडी – काळगाव (२६.७४), केळोली (६६),  कोळेकरवाडी (७५.०५), कोंजवडे (४९.३२), मान्याचीवाडी – कुंभारगाव (४७.५३), कुसरुंड (४७.०९), कुठरे (२४.६६), मणदुरे (४३.१९), पाडळोशी (४३.०९), रूवले (५६.७७), सातर (४३.८१), शिद्रुकवाडी (२१.४९), तोंडोशी (३६.१८), विरेवाडी (२६.४७), मुरुड (४२.४१), धनगरवाडी-तारळे (११७.८०), चौगुलेवाडी (का) अंतर्गत आचरेवाडी, चौगुलेवाडी (का) अंतर्गत कोळगेवाडी व चौगुलेवाडी (का) अंतर्गत मुटलवाडी (९०.६३), चव्हाणवाडी – धामणी (१४.९७), डाकेवाडी -काळगाव (१४.२२), मराठवाडी – दिवशी खु (८) यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर कळंबे (१०.८६), नेचल (१०.९९),  खिवशी (१४.९७),  जांभुळवाडी (कुंभारगाव) (१३.२८), ढेबेवाडी (५६.५२), डिगेवाडी (६६.३०), ताईगडेवाडी (१५२.११), किल्ले मोरगिरी (२४.९३), वायचळवाडी-कुंभारगाव (३९.०१), पाठवडे (३०.५९), सडावाघापूर (२२४.७९), साईकडे (५७.३०), सणबुर (९९.०५), शितपवाडी (३२.३३), सुपुगडेवाडी (५०.९७), बिबी (३९.९९), येरफळे (८४.२७), साखरी (५३.०७), धामणी (१०७.३३), धडामवाडी (५५.३५), जिंती (१४४.७८) तसेच डोंगळेवाडी, गुंजाळी, काळगाव-लोहारवाडी, कसणी, कवडेवाडी, महिंद, मेंढोशी, भोसगाव, बेलवडे खुर्द, गोकुळ तर्फ हेळवाक, ताईगडेवाडी, कळकेवाडी, कळंबे, लोटलेवाडी-काळगाव, येळेवाडी-काळगाव, बीबी आदी गावातील योजनेच्या कामाची कार्यवाही प्रगतीत आहे.