हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Funny Video) सोशल मीडियावर कायम वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यांपैकी काही व्हिडीओ पाहून खरोखरच मनाला आनंद होतो. जस की, सोशल मीडियावर बऱ्याच लहान मुलांचे गोड व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे पाहून दिवसभराचा थकवा क्षणात निघून जातो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये ही चिमुकली शाळेच्या कार्यक्रमात एक कविता सादर करते आहे. आपल्या बोबड्या स्वरात तीने अशी काही कविता ऐकवलीये की, तुमच्याही गालावर खुद्कन हसू येईल.
व्हायरल व्हिडीओ (Funny Video)
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक चिमुकली मुलगी आपल्या शाळेच्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसत आहे. हा कार्यक्रम एखाद्या शाळेचे वर्षक स्नेहसंमेलन असल्याचे समजत आहे. या व्हिडिओतील चिमुकलीने मस्त नऊवारी साडी नेसून मराठमोळा लूक केला आहे. ज्यामध्ये ती फारच गोड दिसते आहे. स्टेजवर उभी राहून ही चिमुकली समोर बसलेल्या पाहुणे मंडळींसमोर अत्यंत आत्मविश्वासाने कविता सादर करते आहे. तिच्या बोबड्या स्वरात तिने सादर केलेली कविता अशी आहे की, (Funny Video)
आणल्या बाई पाकुळ्या धरुन,
दिले बाई नवऱ्याला तळून..
नवरा गेला पळून..
आता काय करायचं रडून?
घ्या बाई दुसरा करुन’.
या चिमुकलीच्या कवितेने एका क्षणात संपूर्ण सभागृहात हशा पिकवला आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर anotherneha नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तर या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘हे मला माझ्या भावंडांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत शिकवलं होतं जे मी शाळेत सादर केलं’. हा व्हिडीओ आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिला त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Funny Video)एका युजरने म्हटलंय, ‘लहानपणीचा आवाज.. किती गोड आहे’. तर आणखी एकाने म्हटलंय, ‘लहान मुलं अशीच असतात त्यांना जे शिकवलं जातं तेच ते बोलतात करतात, हीच त्यांची निरागसता आहे’.