Wednesday, February 1, 2023

फलटण तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा : पोलिसांची 9 जणांवर कारवाई

- Advertisement -

फलटण | सस्तेवाडी (ता. फलटण) याठिकाणी चालू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर फलटण ग्रामीण पोलीसांनी छापा टाकला. या छाप्यात 9 जणावर कारवाई करण्यात आली असून रोख रक्कमेसह 2 लाख 93 हजार रुपये किमतींचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, सस्तेवाडी गावच्या हद्दीत सतीश जाधव यांच्या शेताजवळ असलेल्या झाडाच्या खाली मोकळ्या जागेत जुगार खेळावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील काही अधिकारी व कर्मचारी यांनी छापा टाकला टाकला. यामध्ये विजय जगन्नाथ घाडगे (वय- 46, रा. कुंभारभट्टी मलटण, ता. फलटण), सागर अजित जाधव (वय- 26, रा. गुणवडी, ता.बारामती), किरण भालचंद्र खरात (वय-28, रा. माळेगाव, ता. बारामती), रणजीत उर्फ गोटू शंकर जाधव (वय- 27,रा. सोमवार पेठ, फलटण), अजय यशवंत घाडगे (वय- 24 रा. निरा वाघच, ता. बारामती), रमेश नंदू कुंभार (वय- 24, रा. कुंभार भट्टी मलटण, ता.फलटण), रोहन दिलीप माने (वय- 32, रा. शुक्रवार पेठ, फलटण), अण्णा पोपट पवार (वय -30, रा. धुळेदेव ता.फलटण), ज्ञानेश्वर नारायण सुतार (वय- 34, रा. सोमंथळी) हे जुगार अड्ड्यावर आढळून आले आहेत.

- Advertisement -

संशयितांकडे 2 लाख 93 हजार रुपये किमतींचा रोख रकमेसह मुद्देमाासह फलटण ग्रामीण पोलीसांनी जप्त करण्यात आला आहे‌. अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस करीत आहेत. नव्या वर्षात केलेल्या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांवर चांगलीच खळबळ उडाली आहे. तसेच यापुढे अशा कारवाईत सातत्या राहणार असल्याने कायदा हातात घेवू नये, असे आवाहन फलटण ग्रामीण पोलिसांनी केले आहे.