हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दरवर्षी प्रमाणेच ह्या वर्षीदेखील गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा होणार आहे. सगळीकडेच गणेशोत्सवाची तयारी सुरु असून गणरायाच्या आगमनासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. बाप्पाच्या आगमनासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आतुर असतात. असं म्हणतात की,जिथे बाप्पाचा वास असतो, तिथे प्रत्येक क्षणी सुख-समृद्धी असते. गणेशोत्सवा दरम्यान भाविक सलग 10 दिवस संपूर्ण विधीपूर्वक गणपतीची पूजा करतात.
यावर्षी गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी येत आहे. आणि गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी आहे. यावेळी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी 18 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12.39 वाजता सुरू होईल, मात्र तिचा उदय 19 सप्टेंबर रोजी होईल. तर 28 सप्टेंबर 2023 रोजी गणेश विसर्जन असणार आहे.
गणेश चतुर्थीची सुरूवात आणि समाप्ती तारीख :
गणेश चतुर्थी 18 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12.39 वा. सुरु होणार असून तर 19 सप्टेंबर 2023 दुपारी 1.43 वाजेपर्यंत गणेश चतुर्थीचा काळ आहे. या काळात तुम्ही गणेश्याची मूर्ती आपल्या घरी आणून तिची प्राणप्रतिष्ठा करू शकता.
मात्र प्राणप्रतिष्ठेसाठीची शुभ वेळ : 19 सप्टेंबरला सकाळी 11:07 ते दुपारी 01:34 असेल.
गणेशमूर्ती आणताना खालील गोष्टी लक्षात ठेवा:
गणेशमूर्ती चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करा.
मूर्तीची डोळे, कान आणि तोंड व्यवस्थित असल्याची खात्री करा.
मूर्तीस हार, फुले अर्पण करून मगच गणेश मूर्ती घरी आणा.
गणेश पूजेची पद्धती :
गणेश मूर्ती सुशोभीत केलेल्या जागेवरती बसवून सर्व पूजा साहित्य सोबत ठेवून मगच पूजेला सुरुवात करावी .सुरुवातीला श्रीगणेशाचे स्मरण करून मग गणेशमूर्तीवर पाणी शिंपडावे.
पूजेच्या साहित्यात असलेले हळद, तांदूळ, चंदन, गुलाल, शेंदूर, दुर्वा, जानवे, पेढे, मोदक, फळे, हार, फुले यांचा विधिवत गणेश पूजेसाठी उपयोग करावा.गणपतीच्या पूजेसाठी तयार केलेले सर्व साहित्य अर्पण करा.यानंतर श्रीगणेशासह भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी.त्यानंतर बाप्पाची विधीवत पूजा करा. आरतीनंतर नैवेद्य अर्पण करा.