Ganesh Chaturthi 2024 : संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहाने धुमधडाक्यात साजरा करण्याची प्रथा आहे. अगदी काही तासांत गणेश चतुर्थीला सुरुवात होणार आहे. मात्र त्याकरिता तयारीची लगबग आधीपासूनच सुरू झालेली आहे. गणपतीसाठी लागणारे सर्व साहित्यांनी बाजारपेठ फुलून गेली आहे. तुम्ही देखील उद्या तुमच्या घरात गणेशाची स्थापना करणार असाल तर त्यासाठीचा शुभ मुहूर्त काय आहे ? याची माहिती या लेखात करुन घेणार आहोत. चला (Ganesh Chaturthi 2024) तर मग जाणून घेऊया…
गणेश स्थापना (Ganesh Chaturthi 2024)
उद्या शनिवार भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्ता पासून म्हणजे पहाटे 4:50 ते दुपारी 1: 51 पर्यंत आपल्या सोयीने घरातील गणेशाची स्थापना आणि पूजन करता येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना मध्यान नंतर देखील करता येऊ शकते अशी माहिती पंचांग करते मोहन दाते यांनी एका माध्यमाला दिली आहे.
गौरी आवाहन, पूजन, विसर्जन
आता गौरी आवाहनाबद्दल जाणून घ्यायचं झाल्यास 10 सप्टेंबर रोजी मंगळवारी गौरी आवाहन आहे. अनुराधा नक्षत्रावर रात्री 8 वाजून 4 मिनिटांपर्यंत कधीही तुम्ही गौरी घरी घेऊ शकता. ज्येष्ठ नक्षत्र मध्येही असलेल्या दिवशी पूजन करावे असे असल्याने दिनांक 11 सप्टेंबर रोजी बुधवारी नेहमीप्रमाणे गौरीची पूजा करावी आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करायचे आहे. दिनांक 12 सप्टेंबर रोजी गुरुवारी रात्री 9 : 53 पर्यंत तुम्हाला गौरी विसर्जन करता येणार आहे. काही जणांकडे (Ganesh Chaturthi 2024) घरगुती गणपती आणि गौरी एकाचवेळी विसर्जन करण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे तुम्ही गौरीसोबत गणपती विसर्जन करू शकता.
गणेश विसर्जन
17 सप्टेंबर रोजी मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. हा गणेश स्थापनेपासूनचा अकरावा दिवस आहे. ज्यांच्याकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केलं जातं त्यांच्याकडे 11 दिवसांचा उत्सव असेल. तसंच या दिवशी मंगळवार म्हणजेच गणेशाचा वार असला तरीही परंपरेप्रमाणे विसर्जन करावे. या दिवशी गणेश चतुर्थीची तिथी दुपारी पावणे बारा वाजताच (Ganesh Chaturthi 2024) संपत आहे. तरीही त्यानंतर देखील विसर्जन करता येणार आहे. अशी माहिती दाते यांनी दिली आहे.