पुणे | सुनिल शेवरे
गणेशोत्सव आता अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेला असताना गणेश मूर्तिंच्या विक्रीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. दरवर्षी पुण्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा उत्सव पुण्यातून सुरु झाला असल्यामुळे संपूर्ण भारताचे लक्ष पुण्याकडे असते. वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्त्या आणि सजावटीचं साहित्य दरवर्षी बाजारात येत असतं. पुण्यातील विविध भागांतील घरात मोठ्या गणेश मूर्तिची स्थापना करतात. गणेश मुर्ती विकत घेत असताना पुण्यात सारसबागेजवळ मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करतात. यंदा मूर्ती घेताना जीएसटी टॅक्स लागणार का? आणि त्यामुळे किती प्रमाणात ग्राहकांवर परिणाम होईल? हे गणेशमूर्ती स्थापनेच्या दिवशीच कळेल. शहराचे प्रमुख मूर्ती विक्री केंद्र असल्याने सारसबागेजवळ असलेल्या स्टॉलला वेगळी झळाळी आल्याच दिसत आहे.