Ganesh Chaturthi 2023 : यंदाच्या गणेश चतुर्थीचे विशेष महत्त्व; जाणून घ्या मुहूर्ताची वेळ आणि पुजा पद्धत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सप्टेंबर महिना सुरू झाला की गणपती बाप्पाच्या आगमना ची (Ganesh Chaturthi 2023) तयारी सुरू करण्यात येते. गणपतीच्या मुर्त्या बनवणे, सजावट करणे, वर्गणी गोळा करायला सुरुवात करणे अशा कित्येक कामांची लगबग सुरू होते. गणपतीचा जन्मोत्सव हा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतो. संपुर्ण 10 दिवस हा गणेश उत्सव साजरी केला जातो. यादरम्यान गणपती बाप्पाची स्थापना करून त्याची आरती, अभिषेक केला जातो. दरवर्षी तिथीनुसार शुभ मुहूर्त पाहून ही स्थापना करण्यात येते. त्यामुळे यावर्षी देखील तिथीप्रमाणे गणपती बाप्पाच्या स्थापनेची वेळ बदलली आहे. आज आपण या स्थापनेच्या मुहूर्ताविषयी जाणून घेणार आहोत.

गणेश चतुर्थी अचूक तारीख (Ganesh Chaturthi 2023)

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यासाठीची संपूर्ण तयारी राज्यात सुरू करण्यात आली आहे. परंतु त्यापूर्वी आपल्याला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 2 दिवस राहिली असली तरी तिची उदय 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सव 19 सप्टेंबरपासून सुरू होऊन 28 सप्टेंबरला संपेल. 28 सप्टेंबर 2023 रोजी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येईल.

गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त

यंदा भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्थी तिथीची वेळ 18 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12.39 वाजताची आहे. तर गणेश चतुर्थीची समाप्ती तारीख 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1.43 वाजताची आहे. मुख्य म्हणजे गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त, 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11:07 ते दुपारी 01:34 दरम्यानचा आहे. पंचांगानुसार पाहिला गेले तर, 19 सप्टेंबर रोजी स्वाती नक्षत्र दुपारी 01.48 पर्यंत राहील. गणेश चतुर्थीच्या दिवशी 2 शुभ योग तयार होतील. या दिवशी वैधृती योगही असेल जो अत्यंत शुभ मानला जाईल.

गणपती बाप्पाची पूजा पद्धत

अनेकवेळा गणेशोत्सवाच्या (Ganesh Chaturthi 2023) आनंदात आपल्याकडून गणपती बाप्पाच्या पूजा पद्धतीत (Ganeshotsav Puja)
काही चुका होतात ज्या आपल्याला कळून देखील येत नाही. मात्र गणपती बाप्पाची पूजा करताना सर्वात प्रथम ‘ओम गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप करावा. त्यानंतर स्थापन केलेल्या गणेशमूर्तीवर पाणी शिंपडावे. पूजेच्या साहित्यात नेहमी हळद, तांदूळ, चंदन, गुलाल, शेंदूर, मौली धागा, दुर्वा, जानवे, पेढे, मोदक, फळे, हार, फुले या गोष्टींचा समावेश करावा. गणपती बाप्पाच्या पूजेसाठी तयार केलेले सर्व साहित्य एक एक करून मूर्तीला अर्पण करावे. गणरायाच्या पूजेनंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची देखील पूजा करावी. बाप्पाच्या आरती नंतर मोदक तसेच आरतीनंतर 21 लाडू नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर गणपतीच्या मूर्तीजवळ 5 लाडू ठेवून बाकीचे प्रसाद ब्राह्मण आणि आजपासच्या लोकांना वाटून द्यावेत. अशाप्रकारे यावर्षी गणपती बाप्पाची पूजा करावी.