8 वर्षांपासून हजारो गणेश मूर्ती बनवणारा अवलिया; पुणेकरांसाठी ठरतोय चर्चेचा विषय

Ganesh Murti pune
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सन म्हणजे गणपती उत्सव होय.. हिंदू धर्मियांच्या प्रत्येकाच्या घराघरात साजरा होणारा गणपती उत्सव हा यंदा २७ ऑगस्टपासून सुरू होत आहे.त्यामुळे सगळीकडे गणरायाच्या आगमनाची लगबग चालू आहे. गणेशोत्सव म्हंटल कि आपल्याकडे शहरात,गावांत किवा अगदी गल्लीबोळात सार्वजनिक गणपतीच्या प्राणप्रतिष्ठा केली जाते.त्यासाठी अनेक ठिकाणी गणपती मंडळाची स्थापना केली जाते.. त्यासाठी सुंदर गणपतीच्या मुर्त्यादेखील बनविल्या जातात. राज्यात अनेक ठिकाणी अतिशय सुंदर गणेशाच्या मूर्त्या बनतात. असाच एक अवलिया पुण्यातील कात्रज या ठिकाणी गेल्या आठ वर्षापासून गणेशाची मूर्ती बनवत आहे. सुमित जाधव असं सदर मुर्तीकाराचे नाव असून त्यांनी आजवर हजारो गणेशमूर्ती बनवल्या आहेत.

गेल्या आठ वर्षाचा अनुभव यंदाही पणाला लावून सुमित जाधव यांनी गणेश भक्तांसाठी आकर्षक गणपतीमूर्ती बनविल्या आहेत.. जाधव दाम्पत्य हे पुण्यातील कात्रज येथे वास्तव्यास असून, सुमित जाधव यांना लहानपणापासूनच कलेची आवड होती. तर या कामासाठी त्यांची पत्नी पूनम यांचीही त्यांना मदत होते. त्यांचेही कला विषयात शिक्षण झाले आहे. सुमित जाधव यांच्या ‘दुर्वा आर्ट्स’च्या माध्यमातून दरवर्षी हजारो सुंदर व सुबक गणेशमूर्ती बनविण्याचे काम करतात. याशिवाय जुन्या मूर्तींना रंगरंगोटी करून सुशोभीकरणाचं काम देखील त्यांच्या मूर्तीशाळेमध्ये केलं जातं.

जाधव यांच्या आवडीमुळे त्यांच्या मूर्तीशाळेमध्ये आजवर हजारो गणपतीच्या वेगवेगळ्या आकर्षक मूर्ती तयार झाल्या आहेत.तसेच पर्यावरणाची काळजी म्हणून त्यांनी शाडू मातीच्या मुर्त्या सुद्धा बनविल्या जातात. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींची विटंबना होते, म्हणून जाधव यांनी शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच नागरिकांची हि पर्यावरणपूरक मुर्त्यांना मागणी असते.