हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ganesh Puja 2025 । अवघ्या ४ दिवसांनी म्हणजेच २७ आगस्ट रोजी आपल्याकडे गणपतीबाप्पाचे आगमन होणार आहे. त्या निमित्याने सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग तयारी चालू आहे. गणेशोत्सवाच्या काळात गणरायाची मनोभावे पूजा केली जाते,…. आरती म्हंटली जाते.. गणरायासाठी त्याच्या आवडीचे गोड पदार्थ केले जातात. सध्या भाविकांकडून गणपतीच्या आगमननिमित्य पूजार्च्या सामानाची खरेदी चालू आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे गणरायांना आवडणाऱ्या वस्तूंची खरेदी केली जाते. त्यात कुंकू,हळद,कापूर, नैवेद्य, पेठे, नारळ अगरबत्ती, फुले या पूजेच्या सामानाची खरेदी महत्वाची असते. हिंदू संस्कृतीमध्ये पूजेला फार महत्व आहे.पूजा करण्यासाठी लागणाऱ्या सामानाला पूजेचे सामान संबोधले. हे सामान म्हणजे फक्त वस्तू नसतात तर यात भक्तांच्या भावना, श्रद्दा असतात. त्यामुळे हिंदू संस्कृतीमध्ये पूजेच्या सामानाला अनन्य साधारण महत्व असते.
या पूजेच्या सामानात (Ganesh Puja 2025) सर्वात महत्त्वाचे असतात ती म्हणजे फुले… दैवताला प्रसन्न करण्यासाठी भक्त हा फुले वाहतो. तसेच फुलांना वेगवेगळ्या देवतांचे वाहन देखील समजले जाते. यामुळे पूजा करताना सर्वात महत्वाचे स्थान हे फुलाला असत. यानंतर अगरबत्तीचे महत्व बघितले तर वातावरण शांत ठेवण्यास मदत करते. तर नारळाचे सुद्धा फार मोठं महत्व आहे, नारळाला श्रीफळ म्हणून देखील ओळखले जाते. तर कापूर हे नागरात्मक दूर करते.हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक म्हणून वापरले जाते. नैवद्य हा देवाला भोजन म्हणून अर्पण केला जातो. दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून तयार करण्यात आलेलं पंचामृत गणपतीला अभिषेक करण्यासाठी वापरलं जातं, त्याच सुद्धा गणेश पूजेत मोठं महत्व आहे.
पूजेचे साहित्य म्हणजे वस्तू नसून भक्तांची श्रद्धा – Ganesh Puja 2025
जसं आम्ही सांगितलं कि, पूजेचे साहित्य म्हणजे वस्तू नसून भक्तांची श्रद्धा असते. भक्तीभावाने केलेल्या पूजेमुळे माणसाला मानसिक समाधान मिळाल्याची अनुभूती मिळते. म्हणून आपल्याकडे देवाची पूजाआर्च केली जाते. पूजाअर्चेच्या दरम्यान वापरलेल्या सामानाला संस्कृतीचा अविभाज्य घटक समजला जातो.




