हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ganesh Puja 2025 । येत्या २७ ऑगस्टला गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. सर्वत्र गणेशाच्या तयारीची लगबग सुरु असून आरास मांडणे, घर स्वच्छ आणि निटनिटके ठेवणे, फुलांचे हार बनवणे चालू आहे. कधी एकदा गणपती बाप्पा घरी येतात असं सर्वाना झालं आहे, इतकी गणरायाची आतुरता सर्वाना लागली आहे. गणेशोत्सवाच्या १० दिवसात मनोभावे गणेशाची पूजा केली जाते, त्याला गोड गोड प्रसाद दिला जातो. काहीजण २१ पानांसह मोदक आणि लाडू देऊन गणपतीची पूजा करतात, याला पत्र पूजा म्हणतात. शास्त्रांनुसार, या पानांचे वेगवेगळे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. असे मानले जाते की २१ पाने अर्पण केल्याने विघ्नहर्ता गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतो आणि भक्तांच्या जीवनातील त्रास दूर करतो. आज आपण या पूजेबद्दल खास माहिती जाणून घेऊयात.
२१ पानांमध्ये कोणकोणत्या पानांचा समावेश?
दूर्वा (तीन दुर्वा मिळून एकत्र केलेली), बेलाचे पान, मारवा, बदाम , आपटा, शमी, आघाडा, दुर्वा, चाफा, मंजिष्ठा, तुलसी, धत्तूरा, भृंगराज, जाई/जुई (पान), पारिजातक (हारशिंगार), करवीर ,अशोक, केतकी, माका, अंबर, नंदीवृक्ष, बोर या पानांचा समावेश आहे.
गणपतीची पत्र पूजा कशी करावी? Ganesh Puja 2025
सर्वात आधी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. तुमचं घर साफ आणि नीटनेटके ठेवा. गणेश मूर्तीच्या समोर बसा आणि दीप लावा. यानंतर सर्व २१ पाने धुऊन स्वच्छ करून तयार ठेवा. आता तुमचा पूजा विधी सुरु होईल, तत्पूर्वी हातात अक्षता घेऊन, संकल्प करा
“मम सर्वविघ्नप्रशमनार्थं श्रीगणेशपूजां करिष्ये।” हा मात्र त्यावेळी म्हणा,… (Ganesh Puja 2025)
यानंतर गणेशासाठी आवाहन मंत्र म्हणावा लागेल. ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे । कविं कवीनामुपमश्रवस्तमम्। या मंत्राचा जप करा.
आता गणरायाला गंध, अक्षता, फुलं अर्पण करा
गणपतीला तिळाचे तेल किंवा पाण्याने स्नान घाला
गंध लावा (हळद, कुंकू, चंदन)
आता अक्षता व फुलं अर्पण करा
आता आपली २१ पानांची मुख्य पूजा असेल.. यावेळी प्रत्येक पण अर्पंण करताना ॐ [पत्रीचे नाव] पत्रं समर्पयामि। उदा: ॐ दूर्वा पत्रं समर्पयामि। हा मंत्र म्हणा…. याठिकाणी लक्षात ठेवा कि एका वेळेस एकच पान गणरायाच्या चरणांजवळ अर्पण करा. पूजा झाली कि गणपती बाप्पाच्या आवडीचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवा.




