आश्चर्यकारक! गणेश मंदिराला सजवले 2 कोटी नोटांनी आणि 52.50 लाख नाण्यांनी; Video Viral

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गणेश उत्सवाची तयारी संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशात सुरू झाली आहे. गणेश उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी गणेशाची मंदिरे सजवली जात आहेत. त्याची आरास तयार करण्यात येत आहे. यादरम्यानच बेंगलोर येथील श्री सत्य गणपती मंदिर चांगलेच चर्चेत आले आहे. कारण हे मंदिर गणेशोत्सवाच्या निमित्ताने नोटांनी आणि नाण्यांनी सजवण्यात आले आहे. या मंदिराला सजवण्यासाठी चक्क शंभर , पाचशे, दोनशेच्या नोटा वापरण्यात आले आहेत. त्यामुळे या मंदिराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नोटांनी सजवले मंदिर

बेंगलोरु येथील जेबी नगरमध्ये असलेल्या सत्य गणपती मंदिरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. या मंदिरातील पुजाऱ्यांनी यावेळी मंदिराला चक्क 500, 200,100, 50, 20, 10 च्या नोटांनी सजवले आहे. तसेच, यामध्ये रुपयांच्या नाण्यांचा देखील वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हे मंदिर प्रचंड आकर्षित आणि सुंदर दिसत आहे. या मंदिराला पाहण्यासाठी गणेशभक्त वेगवेगळ्या ठिकाणाहून जात आहेत.

52.50 लाख नाण्यांचा वापर

याबाबतची माहिती देत मंदिराचे ट्रस्टी मोहन राजू यांनी माध्यमांचे संवाद साधताना सांगितले आहे की, गेल्या दहा-बारा वर्षांपासून आम्ही मंदिराला वेगवेगळ्या थीमसह सजवत आहोत. परंतु यावर्षी आम्ही मंदिराला वेगळ्या पद्धतीने सजवण्याचा विचार केला आहे. यावेळी मंदिराच्या परिसराला सुशोभित करण्यासाठी आम्ही एकूण 52.50 लाख नाणी आणि दोन कोटी सहा लाख नोटांचा वापर केला आहे. यापूर्वी आम्ही अशाच वेगवेगळ्या पद्धतीने मंदिराला सजवले आहे.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर या गणेश मंदिराच्या सजावटीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मंदिराला नोटांनी सजवण्यात आल्यामुळे हा व्हिडिओ बघून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. अनेकांनी या मंदिराचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. वेगवेगळ्या भागात गणपतीची आरास रचली जात असताना हे मंदिर सर्वात जास्त चर्चेत आले आहे.