Ganeshotsav 2024 : गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी ! मंडळांच्या कार्यालयाचे भाडे होणार कमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ganeshotsav 2024 : अवघ्या महाराष्ट्राला ज्याची ओढ लागली आहे असा यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव येत्या ७ सप्टेंबर पासून सुरु होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण धुमधडाक्यात साजरा होतो. या दरम्यान अनेक सार्वजनिक मंडळांकडून गणपतीची स्थापना केली जाते शिवाय विविध कार्यक्रमही आखले जातात. मोठ्या गणेश मंडळांच्या बाबतीत राज्य शासनाकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. चला (Ganeshotsav 2024) जाणून घेऊयात

वर्षभर कार्यक्रम राबवणाऱ्या मोठ्या गणेशोत्सव मंडळांना त्यांच्या कार्यालयाचं भाडं कमर्शियल दराप्रमाणे घेतलं जातं. ते रेसिडेन्शियल दराने घेण्यात यावं अशी मागणी या मंडळांकडून करण्यात आली होती. आता सरकारनं ही मागणी पूर्ण केली आहे. कार्यालयाचे भाडं हे कमर्शियल दराने घेतल्यामुळे मोठे (Ganeshotsav 2024) थकबाकी मंडळांच्या वर होती. शिवाय त्याच्यावरील व्याज रद्द करावा आणि भाड्याच्या रकमेमध्ये 50 टक्के कपात करावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. याचबरोबर अग्निशामक दलाचे लाखो रुपयांचे भाडे मंडळाला भरावे लागत होते ते भाडे पूर्णपणे माफ करण्यात आल्याचे माहिती देखील मंत्री केसरकर यांनी दिली आहे.

घेतले जाणार महत्वपूर्ण निर्णय (Ganeshotsav 2024)

मूर्तिकारांच्या प्रश्नाबाबत बोलताना केसरकर यांनी सांगितले की मूर्तिकारांच्या प्रश्नावर सुद्धा चर्चा झाली. मूर्तिकारांना साहित्य सबसिडी योजना राबविण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे असे त्यांनी सांगितले.

लालबागचा राजा किंवा इतर मोठ्या मंडळाच्या आजूबाजूचे पार्किंग लॉट गणेशोत्सव काळामध्ये मोफत करण्यात येणार आहेत. (Ganeshotsav 2024) हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय केसरकर यांनी बोलताना सांगितले की पर्यावरण पूरक गणेशोत्सव कसा साजरा केला जाईल यासाठी विशेष पुढाकार (Ganeshotsav 2024) घेतला जाणार आहे.

याबरोबरच गणेशोत्सव काळामध्ये मुंबईच्या लोकल ट्रेन रात्रभर चालू ठेवण्याच्या सूचना रेल्वे मंत्रालयाला करणार आहोत असं केसरकर (Ganeshotsav 2024) यांनी सांगितलं