Ganeshotsav 2024 : आपल्याला माहितीच असेल की शिक्षणाची पांढरी म्हणून ओळखलया जणाऱ्या पुण्याला आता IT हब म्हणून सुद्धा ओळखले जाते आहे. पुण्यात नोकरी, शिक्षण या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येऊन वसलेले आहेत. त्याचप्रमाणे पुण्यात कोकणी लोकांचे सुद्धा वास्तव्य आहे. कोकणी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी गणेशोत्सवासाठी कोकणात जातोच जातो. म्हणूनच ऐनवेळी होणारी गर्दी पाहता रेल्वे खात्याकडून कोकणात जाण्यासाठी विशेष २२२ गाड्यांची सोय करण्यात आली आहे. यात पुणे येथून सुटणाऱ्या गाडीचा सुद्धा समावेश आहे. चला अधिक जाणून घेऊया पुण्याहून सुटणाऱ्या या विशेष (Ganeshotsav 2024) गाडीबद्दल…
पुण्याहून रत्नागिरी साठी विशेष ट्रेन धावणार आहेत मध्य रेल्वेच्या माध्यमातून हे विशेष गाडी सोडण्यात येत आहे. या गाडीसाठी जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर तुम्ही 7 ऑगस्टपासून या गाडीसाठी बुकिंग करू शकता.
मध्य रेल्वे दिलेल्या माहितीनुसार पुणे – रत्नागिरी विशेष एक्सप्रेस गाडी क्रमांक 0 1 4 4 7 पुणे इथून 7 सप्टेंबर आणि 14 सप्टेंबरला रवाना होणार आहे आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी 11:50 वाजता पोहोचणार आहे म्हणजेच या गाडीच्या दोन फेऱ्या होणार आहेत. दुसरी एक गाडी क्रमांक 0 1 4 4 8 या गाडीच्या सुद्धा दोन फेऱ्या होणार आहेत. ही गाडी रत्नागिरी इथून दिनांक ८ आणि दिनांक 15 रोजी सोडली जाणार आहे. ही गाडी (Ganeshotsav 2024) रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून याच दिवशी 17 वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल तर पुणे इथे दुसऱ्या दिवशी पाच वाजता पोहोचणार आहे.
‘या’ स्थानकांवर थांबे घेणार
मध्य रेल्वे कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या ट्रेनला अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही साप्ताहिक विशेष गाडी चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबा घेणार आहे त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात पुणे ते रत्नागिरी दरम्यान प्रवास करणाऱ्या अनेकांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.
कोकणात जाणाऱ्या इतर गाड्या
लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी द्विसाप्ताहिक
लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी द्विसाप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांच्या एकूण आठ फेऱ्या असतील. गाडी क्रमांक 0 1 0 31 एलटीटी इथून 6, 7, 13, 14 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार 50 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. तर तीच गाडी रत्नागिरी इथून ७,८,14 आणि 15 सप्टेंबर रोजी सकाळी ८ : 40 वाजता सुटेल आणि एलटीटी इथे त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचेल.
पनवेल रत्नागिरी साप्ताहिक विशेष
पनवेल रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडीच्या एकूण चार फेऱ्या होतील. गाडी क्रमांक 0 1 4 4 3 पनवेल इथून आठ आणि पंधरा सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजून 40 मिनिटांनी सुटेल तर रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी 11:50 वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक 0 1 4 4 4 रत्नागिरी इथून 7 आणि 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल आणि पनवेल इथं दुसऱ्या दिवशी रात्री दीड वाजता पोहोचेल.
पनवेल रत्नागिरी साप्ताहिक विशेष
पनवेल रत्नागिरी साप्ताहिक विशेष रेल्वे गाडीच्या दोन फेऱ्या धावतील गाडी क्रमांक 0 1 4 4 1 पनवेल इथून 11 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल. तर दुसरी गाडी 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच पन्नास वाजता रत्नागिरी इथून गाडी सुटेल आणि पनवेल इथे दुसऱ्या दिवशी रात्री दीड वाजता पोहोचेल.
या सर्व गणपती विशेष रेल्वे गाड्यांचा आरक्षण हे 7 ऑगस्टपासून सर्व ठिकाणी संगणकीकृत आरक्षण केंद्रावर करण्यात येईल. शिवाय IRCTC च्या संकेतस्थळावर देखील विशेष शुल्क मध्ये सुरू होणार असं मध्य रेल्वे कडून सांगण्यात आला आहे.