Ganeshotsav 2025 : गणपतीला अर्पण करा या गोष्टी; तुमचंही भाग्य उजळेल

Ganeshotsav 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ganeshotsav 2025 । यावर्षी २७ ऑगस्टला गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सव म्हणजे दिवाळीच्या आधीच हिंदूंचा सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो. १० दिवसाचा हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्सहाने साजरा केला जातो. याकाळात गणरायाची मनोभावे पूजा केली जाते. आरती म्हंटली जाते. गणेशाच्या भक्तीत भाविक अगदी तल्लीन होतात. जीवनात प्रगती आणि उन्नती मिळविण्यासाठी ज्योतिषशास्त्र देखील भगवान गणेशाची पूजा करण्याचा सल्ला देते. परंतु हि पूजा करत असताना काही गोष्टी गणपती बाप्पाला अर्पण कराव्या. यामुळे तुमचं भाग्य नक्कीच उजळू शकते.

१) दुर्वा-

गणपती बाप्पाला दुर्वा खूप आवडते. म्हणूनच पूजा करताना गणरायाला दुर्वा अर्पण कराव्या.. सनातन शास्त्रांमध्ये वर्णन केले आहे की, अनलासुर नावाच्या राक्षसाचा वध केल्यानंतर गणपतीच्या अंगाची आग झाली होती. त्यावेळी कश्यप ऋषींनी गणपतीला 21 दुर्वांची जुडी अर्पण केली, ज्यामुळे त्याची आग शांत झाली. तेव्हापासून गणपतीला दुर्वा अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली, असे सांगितले जाते. जर तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्ती मिळवायची असेल तर भगवान गणेशाला (Lord Ganesha) २१ दुर्वा अर्पण करा.

२) गुळाचे मोदक- Ganeshotsav 2025

गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्याला गुळाचे मोदक अर्पण करा. तुम्ही घरी सुद्धा गुळाचे मोदक बनवू शकता. भगवान गणेशाला मोदक खूप आवडतात. यामागे एक पौराणिक कथा आहे. एकदा, देवी पार्वतीला एका दिव्य मोदकाचं (अमृत-सिद्ध) प्राप्ती झाली, ज्यामध्ये सर्व ज्ञान आणि शक्ती सामावलेली होती. तिने तो मोदक गणपतीला खाण्यासाठी दिला. गणपतीने तो मोदक खाल्ला आणि त्याला खूप आनंद झाला. तेव्हापासून गणरायाला मोदक आवडतात. त्यामुळे मोदक अर्पण केल्याने गणपती बाप्पा खूप लवकर प्रसन्न होतात. आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात.

३) सिंदूर

जर तुम्हाला गणपती बाप्पांना प्रसन्न करायचे असेल, तर गणेश चतुर्थीच्या दिवशी (Ganeshotsav 2025) पूजा करताना भगवान गणेशाला सिंदूर नक्कीच अर्पण करा. गणपतीला शेंदूर लावण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणं आहेत. धार्मिक दृष्ट्या, शेंदूर हे शुभ आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते, तर वैज्ञानिक दृष्ट्या, शेंदूरामध्ये काही विशिष्ट गुणधर्म आहेत ज्यामुळे मूर्तीचे संरक्षण होते. इच्छित फळ मिळविण्यासाठी, गणपतीला सिंदूर अर्पण करताना, बाप्पासमोर तुमची इच्छा व्यक्त करा.