Ganeshotsav Celebration 2025 : भक्तांनो, गणरायाच्या आगमनापूर्वी करा ‘ही’ महत्वाची कामे

Ganeshotsav Celebration 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ganeshotsav Celebration 2025 । गणेशोत्सव म्हणजे हिंदूंचा सर्वात मोठा सण… गणेशोत्सवाला सर्वांच्याच घरी गणपती बाप्पाची मूर्ती आणली जाते. गणपती बाप्पा मोरया!! मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषणात लाडक्या बाप्पाचे घरात स्वागत केलं जाते. गणरायासाठी खास अशी आरास केली जाते आणि त्यात बाप्पा विराजमान होतात. तब्बल १० दिवस चालणाऱ्या या गणशोत्सवाला गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते. सकाळ संध्याकाळ आरती म्हंटली जाते. आणि बाप्पासाठी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात. एकूणच काय तर गणेशोत्सवाला सर्वांच्याच घरातील वातावरण अगदी फुललेलं असते.. गणरायाच्या सेवेत भक्तिमय झालेलं असते. यंदा २७ ऑगस्टला गणेशोत्सव आहे. गणरायाला घरी आणण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील, ज्यामुळे गणपती बाप्पा तुमच्यावर खुश होईल. चला तर मग जाणून घेऊयात.

घर स्वच्छ करा

गणपती बाप्पा घरात यायच्या आधी तुमचं घर चांगल्या प्रकारे स्वच्छ करा. कोणतीही घाण किंवा धूळ घरात राहणार नाही याची काळजी घ्या. खास करून ज्याठिकाणी बाप्पा विराजमान होणार आहेत ती संपूर्ण खोली व्यवस्थित साद करा.. घर स्वच्छ असेल तरच घरात सकारात्मक वातावरण पाहायला मिळते.

पूजेचे साहित्य गोळा करा

गणेश चतुर्थी सुरू होण्यापूर्वी, बाजारातून पूजेसाठी लागणारे सगळे साहित्य जसे कि पूजा चौकी, नारळ, कापूर, अगरबत्ती, कलश इत्यादी सर्व वस्तू आणून ठेवा. Ganeshotsav Celebration 2025

सजावटीच्या वस्तू-

गणपती बाप्पाला घरी आणण्यापूर्वी आरास आणि सजावटीच्या सर्व वस्तू आणून ठेवाव्या. रंगीबेरंगी लायटिंग, रांगोळी, दिवे, फुले अशा वस्तू घरी असाव्या… आणि या वस्तूंच्या मदतीने आकर्षक अशी सजावट करावी जे पाहून गणपती बाप्पा प्रसन्न होईल.

फराळाची तयारी करा

गणरायासाठी खास अशा फराळाची तयारी आधीच करा… त्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवा… कारण बाहेरून विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरीच फराळ तयार केला तर त्याची चव आणखी वाढेल.

यंदा गणेशोत्सवाचा शुभ मुहूर्त कधी? Ganeshotsav Celebration 2025

दरम्यान, यंदाची चतुर्थी तिथी 26 ऑगस्ट दुपारी 01:54 वाजेपासून 27 ऑगस्टला दुपारी 03:44 वाजेपर्यंत आहे. तुम्ही २७ ऑगस्टला सकाळी ११:१२ ते दुपारी १:४४ या दरम्यान गणरायाची प्राणप्रतिष्ठा करू शकता. म्हणजेच काय तर यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होईल आणि ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालेल. गणपतीच्या स्वागतासाठी भक्तांकडून जय्यत तयारी सुरु आहे. अनेकजन गावी जाण्याचा प्लॅन आखत आहेत.