हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ganeshotsav Celebration 2025 । सध्या संपूर्ण देशभरात गणेश उत्सवाची तयारी चालू झालेली आहे. २७ तारखेला गणपती बाप्पाचे आगमन होणार असून सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरु आहे. गणेशोत्सवादरम्यान, संपूर्ण घर चांगल्या प्रकारे सजवले जाते.. गणपती बाप्पासाठी आरास केली जाते… जितका दिवस घरात गणपती आहे त्या दिवशी गणरायाची मनोभावे पूजा केली जाते, त्याला नैवेद्य दाखवला जातो… गणरायाला प्रसन्न करून त्याचे आशीर्वाद घेतले जातात. गणपती बाप्पा घरी येणार म्हंटल्यावर घरातील गृहिणीही कामाला लागतात. बाप्पासाठी गोडधोड पदार्थ बनवले जातात… काही जण बाहेरुन काहीतरी गोड़ आणतात तर काहीजण घरच्या घरी पदार्थ बनवतात. तुम्हीही जर घराच्या घरी चविष्ट असा नैवेद्य बनवणार असाल तर आम्ही तुम्हाला एक मस्त रिसीपी सांगणार आहोत.
तस बघितलं तर गणपती बाप्पाचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे मोदक…. परंतु त्याचप्रमाणे गणरायाला मोतीचूर लाडू देखील खूप आवडतात.त्यामुळे यंदाच्या गणेशोत्वसासाठी तुम्हीही बाप्पाला मोतीचूर लाडू खाऊ घालू शकता. आता ते कसे बनवायचे हे आपण सोप्या पद्धतीने जाणून घेऊया.
मोतीचूर लाडू बनवण्यासाठी साहित्य – Ganeshotsav Celebration 2025
बेसन, साखर, दूध, तूप, हिरवी वेलची, फूड कलर, बेकिंग सोडा, पाणी.
मोतीचूर लाडू बनवण्याची पद्धत
मोतीचूर लाडू बनवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी साखरेचा पाक तयार करावा लागेलं. यासाठी तुम्ही मध्यम आचेवर एका मोठ्याकडे पाणी गरम करा. त्यात साखर घाला आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ते पाणी ढवळत रहा. त्यानंतर तुम्ही त्या पाण्यात दूध घालून पाच मिनिटे मंद आचेवर ते पाणी चांगले उकळू द्या. उकळताना त्या पाण्यावर फेस तयार होऊ लागेल. त्यानंतर तुम्ही चमच्याच्या साह्याने पाक घट्ट होईपर्यंत शिजवा त्यानंतर त्या पाकात वेलची पूड आणि केशरी रंग घालून हळूहळू ढवळत रहा. (Ganeshotsav Celebration 2025)
त्यानंतर तुम्ही एका भांड्यात बेसन आणि दूध मऊ होईपर्यंत मिक्स करा. आणि त्यामध्ये बेकिंग सोडा घालून ते चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर एका कढईमध्ये तूप गरम करा कढईच्या अगदी वर झारा ठेवा. आणि लाडूसाठी तयार केलेले बॅटर तेलात घाला. बुंदी तेलात टाकल्यानंतर ती सोनेरी रंगावर होईपर्यंत तळून घ्या.आता ही बुंदी ठीशू पेपरवर काढा. जेणेकरून त्यात असलेले जास्त तेल निघून जाईल. आता ही बुंदी साखरेच्या पाकात घालून नीट मिक्स करा .आणि थंड होईपर्यंत तसेच राहू द्या. थंड झाल्यावर या बुंदीपासून लहान लहान आकाराचे लाडू तयार करा.




