व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होईल : शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

मुंबईत दहिहंडी, गोपाळकाला कार्यक्रमाला सर्व बंधने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काढली होती. आता त्याच पध्दतीने यंदाचा गणेशोत्सवही आनंदाच्या, उत्साहाच्या वातावरणात व धुमधडाक्यात ग्रामीण भागतही साजरा केला जाईल, असे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

सातारा येथे जिल्हा प्रशानाने गणेश उत्सावाची केलेल्या तयारीचा आढावा बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ. अजित बोऱ्हाडे उपस्थित होते. मंत्री श्री. देसाई म्हणाले, कोर्टाच्या आदेशाचे प्रशासनाला पालन करावेच लागेल. परंतु शिंदे- फडणवीस सरकार यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करणार आहे. डॉल्बीला आवाजाची मर्यादा ठेऊन न्यायालयाचे आदेश पाळून उत्सव साजरा करावा. पोलिस प्रशासनाने सर्व गणेश मंडळांना योग्य सूचना दिलेल्या आहेत.

मी 35 वर्षे राजकारणाच्या धंद्यात ः- सध्या मंत्रिमंडळाचा पहिला छोटा विस्तार झाला आहे. मंत्रिमंडळाची संख्या रिक्त असून पुढील विस्तारात महिलांबाबत बदललेलं चित्र पाहायला मिळेल. मी 35 वर्ष राजकारणाच्या धंद्यात आहे. शिवसेनेचा दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री ठरवतील. मात्र, थोरली शिवसेना आमचीच आहे.