Ganpati Idol Theme Controversy : मुस्लीम-गणपती! सिकंदराबादमध्ये थीमवरून नव्या वादाला फोडणी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणपती हा हिंदू धर्मियांचा आराध्य दैवत.. सर्वाचा लाडका बाप्पा… संकटे दूर करणारा हाच तो विघ्नहर्ता.. सध्या सर्वत्र गणेशोत्सव सुरु असून यानें मंडळात मोठमोठे गणपती बाप्पा बसवण्यात आले आहेत. गणरायाला साजेशी अशी आरास करण्यात आली आहे. सर्व गणेश भक्तांमध्ये एकूण आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. मात्र याच दरम्यान, हैद्राबाद येथील सिकंदराबादमधील गणपतीच्या थीम वरून नव्या वाद (Ganpati Idol Theme Controversy) समोर आला आहे. शहरातील युवक संघटनेने गणेशोत्सवासाठी बाजीराव मस्तानी या चित्रपटाची थीम निवडली होती. त्यानंतर लोकांनी दावा केला की ही मूर्ती ‘मुस्लिम गणपती’ची आहे. वास्तविक, मूर्तीतील गणेशाची वेशभूषा पारंपारिक पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे. यामुळे समाजातील काही मंडळींनी यावर आक्षेप व्यक्त केला आहे.

गणपती ‘मुस्लिम-गणपती’सारखा दिसत असल्याचा दावा – (Ganpati Idol Theme Controversy)

सोशल मीडियावर हा गणपती ‘मुस्लिम-गणपती’सारखा दिसत असल्याचा दावा केला जात आहे, तर काही लोक याला धर्मनिरपेक्षतेचा विषय म्हणत आहेत. आयोजकांपैकी एकाने या एकूण सर्व परिस्थितीवर भाष्य करताना म्हंटल कि, ही थीम चित्रपटापासून प्रेरित आहेत, परंतु अंतिम सादरीकरण अपेक्षेप्रमाणे झाले नाही. आम्ही बाजीराव मस्तानी थीमचा प्रचार केला असे नाही, पण ज्या प्रकारे गोष्टी उलगडल्या त्यामुळे काही लोकांच्या मनात आमच्या हेतूबद्दल गैरसमज झाला आहे. आम्ही येथे कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी नाही. भक्तीभावाने आणि आदराने गणेशोत्सव साजरा करण्यावर त्यांचा भर असल्याचे आयोजकांनी सांगितले.

वाद असूनही, असोसिएशनने गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचा आपला इरादा व्यक्त केला आहे आणि लोकांनी त्यांच्या प्रयत्नांचा गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन देखील करण्यात आलं आहे. आयोजकांनी सांगितले की, आम्ही फक्त गणपती बाप्पाला घेऊन पुढे जात आहोत आणि आम्हाला कोणताही वाद नको (Ganpati Idol Theme Controversy) आहे. जशी मूर्ती बनवायची होती, त्यापद्धतीने काम झाल नाही हे मान्य आहे, परंतु आम्ही त्यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही असं म्हणत आयोजकांनी अधिक बोलणं टाळलं.