गणपतराव देशमुख यांचे निधन; सलग 11 वेळा राहिले आमदार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकारणातील जेष्ठ नेते आणि सलग 55 वर्ष आमदार राहिलेले गणपतराव देशमुख यांचे आज निधन झाले. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे.

शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांचे निधन; 54 वर्षे आमदार राहत यशवंतरावांपासून फडणवीसांपर्यंत काम

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गणततराव देशमुख यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पित्ताशयाचे ऑपरेशन पार पडलं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मावळली.

कोण आहेत गणपतराव देशमुख?

गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे . गणपतराव देशमुखांनी ११ टर्म आमदारकी भुषवली. सांगोल्यासारख्या अतिदृष्काळी तालुक्यात विकासाचा मळा फुलवला. शेकापच्या विळा आणि हतोड्याच्या झेंड्याप्रमाणं कामगार आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यात त्यांनी आग्रणी भूमिका घेतली. महाराष्ट्राच्या अनेक बड्या नेत्यांना उदय आणि अस्त त्यांनी पाहिलाय. २०१९ च्या विधानसभेनंतर त्यांनी राजकारणातून सन्यास घेतला.

– शेतकरी कामगार पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघाचा 11 वेळा केलं प्रतिनिधित्व

– सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये सुरु आहेत उपचार,

उपचारादरम्यान पित्ताशयाची शस्त्रक्रिया ही पडली पार

– महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून देवेंद्र फडणवीसांबरोबर केलं काम

– गणपतराव देशमुख राजकारणात येण्यापूर्वी करायचे वकिली

– 1962 साली देशमुखांनी शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली

– आणीबाणीच्या काळात गणपतराव देशमुखांना भोगावा लागला तुरुंगवास

– 1972 च्या निवडणुकीमध्ये गणपत आबांना पराभव पत्करावा लागला होता,

मात्र दोनच वर्षात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा निवडून आले

– 1977 साली गणपत आबांनी महाराष्ट्र विधानसभेच ‘विरोधीपक्ष नेते’ पद ही सांभाळलं

– 1978 च्या शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये गणपत आबा मंत्री झाले,

आणि 1999 ला गणपत आबांची काँग्रेसच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली

– 2019 च्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आणि नातू डॉ.अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली

– तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.करुणानिधी यांनी 12 वेळा निवडणूक लढली आणि जिंकली

गणपती आबांनी 12 वेळा निवडणूक लढवली आणि 11 वेळा जिंकली

– एस टी बस ने प्रवास आणि साधी राहणी यामुळे गणपती आबा लोकप्रिय होते.

Leave a Comment