Gardening Tips : मोगरा कुणाला आवडत नाही सुंगध आणि सुंदरता याचे परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे मोगरा. घरातल्या बागेत मोगरा असेल तर फूलांनी बहरलेला मोगरा पाहूनच मन प्रसन्न होते. साधारण मार्च महिन्यानंतर मोगऱ्याला फुले यायला लागतात. मात्र तुमच्या मोगऱ्याच्या झाडाला फुलं येत नसतील तर आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणारा आहोत. चला जाणून घेऊया…
मोगऱ्याच्या रोपाला पोषण द्या
मोगऱ्याच्या रोपाला कॅल्शियम, झिंक, फॉस्फरस (Gardening Tips) सारख्या पोषक तत्वांची आवश्यकता असते. याकरिता गाईच्या शेणामध्ये एक ते दोन चमचे कॅल्शियम पावडर, आयर्न पावडर, लिम्फ कंपोस्ट, कडूनिंबाचे खत घाला.
घरीच तयार करा खत
मोगऱ्याच्या झाडाकरिता घरच्या घरी खत तयार करण्यासाठी (Gardening Tips)दोन चमचे चुन्यामध्ये जवळपास दोन लिटर पाणी घालून व्यवस्थित मिसळा हे पाणी दिवसातून एकदा झाडाला घाला. ज्या दिवशी तुम्ही चुनायुक्त मिश्रण बनवाल त्यानंतर 24 तास झाडाच्या मुळांना व्यवस्थित हवा लागेल याची काळजी घ्या
ही चूक करू नका (Gardening Tips)
अनेकदा लोक कडूनिंबाचे तेल रोपाला घालतात मात्र हे तेल डायरेक्ट न घालता ते डायल्युट करा आणि मग वापरा.
रिपॉटिंग करा
बरेच दिवस एकाच कुंडीत एकच रोप ठेवल्याने त्याची वाढ खुंटते. वारंवार मातीवर (Gardening Tips) खाली करत राहणे, खत घालणे अशा गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे जुन्या झाडाचे रीपॉटिंग करताना मुळे ट्रिम करा. हे करत असताना मुख्य मुळाला धक्का लावू नका. त्यानंतर त्याची योग्य काळजी घ्या. 15 ते 20 दिवसात रूपांची वाढ चांगली होईल.