Pune Karagruh Police Bharti 2024 | 12 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी, पुण्यात कारागृह विभागात 513 पदांसाठी पोलीस भरती सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Karagruh Police Bharti 2024 | पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आम्ही आलेलो आहोत. कारण आता ही मेगा भरती पुण्यामध्ये केली जाणार आहे. दहावी आणि बारावी उत्तीर्ण असलेले तरुण पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत. आणि ते अर्ज देखील करू शकतात. या संदर्भात अनेक पुस्तके, फिटनेस या बाजूने अनेकांचे प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पोलीस भरती चालेल आहे. 5 मार्च पासून ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे तुम्ही आता तुम्हाला पाहिजे त्या जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

पुणे पोलीस विभागात (Pune Karagruh Police Bharti 2024) एकूण 513 पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत घोषणा देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पुणे कारागृह पोलीस विभाग अंतर्गत कारागृह शिपाई या पदाची रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी विद्यार्थी हा कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

पुणे कारागृह पोलीस विभाग अंतर्गत ही भरती प्रक्रिया होणार आहेत. त्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी आणि 29 वर्षापेक्षा जास्त नसावे. त्याचप्रमाणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही वयोमर्यादा ते 30 वर्षे एवढी आहे.

निवड प्रक्रिया | Pune Karagruh Police Bharti 2024

या भरतीमध्ये शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी वैद्यकीय चाचणी असे टप्पे असणार आहेत.

ऑनलाइन अर्ज कसा करायचा ?

या पुणे कारागृह पोलीस विभाग भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहिती वाचावी.
त्यानंतरच तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

31 मार्च 2024 ही पोलीस भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा या तारखेनंतर भरलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही..

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.