Gardening Tips : मंडळी अनेक वेळा तुमच्या सोबत असे झाले आहे का? तुमच्या बागेतल्या झाडांसाठी तुम्ही पुरेपूर काळजी घेत असतात पुरेशी खतं आणि सूर्यप्रकाश पाणी या सगळ्या गोष्टी देत असतात तरी देखील झाडाची हवी तशी वाढ होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाडावर कीड लागते. त्यातही जर फुलांची झाडे असतील तर पांढरा मावा हा झाडावर पडतो आणि झाड पूर्ण नष्ट होऊन जाते. केवळ फुलांच्या झाडावरच असे नाही मात्र मिरचीच्या झाडावर सुद्धा बर्याचदा असा पांढरा लोकरी मावा पडत असतो. आजच्या लाखात (Gardening Tips ) आपण याच बाबतचा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता.
हा उपाय इतका सोपा आणि घरगुती उपाय आहे की फुलझाडांवर कुठल्याही प्रकारची कीड किंवा रोग काढून टाकण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. यामध्ये कुठल्याही रसायनांचा वापर आपण करणार नाही आहोत (Gardening Tips ) त्यामुळे हा पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा उपाय आहे जो तुमच्या झाडाची कीड पूर्णपणे नष्ट करेल. चला तर मग जाणून घेऊया
हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम एक कांदा घ्या याबरोबरच दीड ते दोन इंचाचा (Gardening Tips )आल्याचा तुकडा आपल्याला लागणार आहे आणि एक टेबल स्पून तिखट आपल्याला लागणार आहे. शिवाय एक लिटर पाणी लागेल.
आता या सगळ्याचे एक विशिष्ट द्रावण आपल्याला तयार करायचा आहे. ते द्रावण आपल्याला झाडावर मारायचे आहे. यासाठी सर्वात आधी कांदा आणि आलं यांची पेस्ट करून घ्या त्यानंतर. एक लिटर पाण्यामध्ये ही कांदा आणि आल्याची (Gardening Tips ) पेस्ट टाका. त्यामध्ये एक टेबलस्पून तिखट टाका.
त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. आणि त्यानंतर हे मिश्रण तुमच्या झाडावर घालू शकता आठवड्यातील दोन ते तीन वेळा हा प्रयोग केला तर तुमच्या झाडावरील कीड रोग नाहीसे होतील.