सावरकरांवरून फडणवीसांची राहुल गांधींना अनोखी ऑफर; म्हणाले, त्यांच्यासाठी मी…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट राष्ट्रीय शहीद दिनानिमित्त म्हणजेच २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हा चित्रपट पाहिला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत राहुल गांधींना एक ऑफर सुद्धा दिली आहे. राहुल गांधींनी सावरकरांचा हा चित्रपट बघावा, ते जर बघणार असतील तर मी त्यांच्यासाठी माझ्या पैशाने संपूर्ण थेटर बुक करेन असं फडणवीस यांनी म्हंटल.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वाचले नाही किंवा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळेच ते त्यांच्याबद्दल बिनबुडाची विधाने करतात. आज मी राहुल गांधींना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन करतो आणि त्यांची खरंच हा चिंत्रपट पाहण्याची इच्छा असेल तर मी माझ्या पैशाने त्यांच्यासाठी संपूर्ण थिएटर बुक करीन. कदाचित मग ते सावरकरांबद्दल निराधार विधाने करणे बंद करतील असा टोला फडणवीसांनी राहुल गांधींना लगावला.

दरम्यान, राहुल गांधी यांनी वीर सावरकरांविरोधात सातत्याने भाष्य करत असतात. भारत जोडो यात्रेमध्येही सावरकर हे स्वातंत्र्यवीर नव्हते तर माफीवीर होते, त्यांनी अनेकदा इंग्रजांना माफीची पत्रे पाठवली असा आरोप करत राहुल गांधींनी निशाणा साधला होता, राहुल गांधींच्या या आरोपानंतर भाजपही आक्रमक झाली होती. त्यामुळे तेव्हापासून सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोपाच्या फैली झडत असतात.