Gardening Tips : जस्वंदाला बहर येत नाही ? वारंवार लागते कीड ? मग ‘हे’ घरगुती उपाय कराच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gardening Tips : गणपतीला वाहिलं जणारं जस्वंदाच झाड हे प्रत्येकाच्या घरात असतंच. ह्या झाडाला वर्षभर फुलं येतात. लाल, रंगीत फुलांनी भरलेलं जास्वदींचं झाड तुमच्या बागेची शोभा वाढवते यात शंकाच नाही. मात्र बऱ्याचदा या झाडाला अचानकपणे कीड लागते. या झाडाला मुंगया ,कीड लागली तर त्याची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया…

जास्वंद लावताना (Gardening Tips)

  • जास्वंद लावताना मातीमध्ये शेणखत किंवा गांडूळ खत, कोकोपीट, वाळू यांचे प्रमाण देखील सगळे मिळून जवळपास ५० टक्के ठेवावे. बाकी ५० टक्के माती असावी.
  • जास्वंदाच्या झाडाला भरपूर सुर्यप्रकाशाची गरज आहे. त्यामुळे चांगला सूर्यप्रकाश मिळेल अशा भागात ते ठेवावे.
    सतत छाटत राहिले पाहिजे. म्हणजे झाडाची उंची न वाढता घेरदार झाड तयार होऊन जास्त फुले येतात.
    केळीची साले, कांद्याची टरफले यांचे पाणी खत म्हणून वापरु शकता. तसेच उकडलेल्या बटाट्याच्या सालांचाही जास्वंदाला खत म्हणून चांगला उपयोग होतो.

कॉफी

कॉफीचे चाहते बरेच आहेत मात्र तुम्हाला माहिती आहे का ? कॉफी पिण्याबरोबरच कॉफी तुमच्या झाडांसाठी (Gardening Tips) खत म्हणून चांगले काम करते. कॉफी ग्राऊंडमुळे रोपाला नायट्रोजन, पोटॅशिमम मिळते. कॉफीच उपाय झाडांसाठी करताना कॉफी पावडरमध्ये मध्ये पाणी मिसळून या पाण्याचा मातीवर स्प्रे करा. ज्यामुळे रोपांची वाढ चांगली होईल.

इनो

काही सेकंदात ऍसिडिटी पळवणारे इनो जास्वंदाच्या रोपाला किड लागू नये म्हणूनही तुम्ही वापरू शकता. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी पाणी घ्या त्यात १ पाकीट इनो घाला. हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिसळून काही वेळासाठी तसंच ठेवून द्या. इनोपासून तयार झालेलं लिक्विड स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि नंतर इतर रोपांवर स्प्रे करा. १ आठवडा या ट्रिकचा वापर केल्यास किड (Gardening Tips) निघून जाण्यास मदत होईल.

केळ्याच्या सालीची पावडर

केळी खाल्ल्यानंतर आपण केळीचे साल टाकून देतो. मात्र केळीच्या सालात पोटॅशिअम असते जे झाडांसाठी खत म्हणून उत्तम काम करते. केळ्याच्या सालीची पावडर हा उत्तम उपाय झाडे बहरण्यासाठी होऊ शकतो. हा उपाय करण्यासाठी केळ्याची सालं सुकवून त्याची पावडर बनवून घ्या. नंतर मातीत मिसळा. यामुळे रोपाची वाढ (Gardening Tips) चांगली होईल. केळ्याच्या सालीमुळे रोपाची वाढ भराभर होईल. यात फॉस्फरेस, नायट्रोजन आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे ग्रोथ चांगली होते. कळ्या आणि फुलंही चांगले येतात.

चहा पावडर

कदाचित घर आपल्याला सापडणार नाही जिथे चहा बनत नाही. चहा पावडर ऊत्तम खत (Gardening Tips) म्हणून वापरले जाऊ शकते. हा उपाय करण्यासाठी चहा पावडर एक ग्लास पाण्यात मिसळून व्यवस्थित उकळून घ्या आणि थोडावेळासाठी तसंच सोडून द्या. २ तासांनी चहा पावडरचं पाणी रोपाच्या चारही बाजूंना घाला.