राज्यात उन्हाळ्याचा प्रभाव वाढत असून, मार्च महिन्यातच तापमानाने उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, शहरभरात उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी उपाययोजना सुरू आहेत.
पुणे महापालिकेचा मोठा निर्णय
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने आणि शालेय सुट्ट्या सुरू झाल्यामुळे पुणे महापालिकेने सार्वजनिक उद्यानांची वेळ वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता उद्याने रात्री ९ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. यापूर्वी ८ वाजता बंद होत असलेल्या उद्यानांचा वेळ १ तास वाढवला आहे.
महापालिकेकडून प्रत्येक उद्यानाची देखभाल आणि तपासणी करण्यात येणार आहे.
उद्यानांची देखभाल आणि सुधारणा सुरू
पुणे महापालिकेने प्रत्येक उद्यानाची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र टीम नियुक्त केली आहे.
उद्यानातील आवश्यक सुधारणा व दुरुस्ती तातडीने करण्यात येणार
शहरातील २२० हून अधिक उद्याने रात्री ९ पर्यंत सुरू राहणार
उष्णतेपासून बचावासाठी
भरपूर पाणी प्या– जरी तहान लागली नसली तरी नियमित अंतराने पाणी प्या.
हलके आणि सैलसर कपडे घाला– सुती आणि हलक्या रंगांचे कपडे परिधान करा.
थेट उन्हापासून बचाव करा – शक्यतो दुपारी ११ ते ४ या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.
शारीरिक श्रम मर्यादित ठेवा – प्रखर उन्हात व्यायाम किंवा शारीरिक श्रम करणं टाळा.
योग्य आहार घ्या – फळांचे रस, नारळ पाणी, ताक यांचा आहारात समावेश करा.
उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका वाढू शकतो, त्यामुळे वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.पुणेकरांसाठी सार्वजनिक उद्याने रात्री ९ वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय हा उन्हाळ्यातील एक मोठा दिलासा ठरणार आहे