Garlic Rate | लसणाच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्याच्या थेट शेतातूनच झाले पीक चोरी, वाचा लसणाचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Garlic Rate | लसूण हा दैनंदिन जीवनात स्वयंपाक करताना आपल्याला लागतच असतो. पण आपण मागील काही दिवसांपासून पाहिले तर लसणाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झालेली दिसत आहेत. देशातील काही भागांमध्ये तर लसूण हा तब्बल 350 ते 400 रुपये किलो दराने विकला जात आहे.आणि हे भाव वाढत जातील असे देखील अनेकांनी मत व्यक्त केले आहेत. यावर्षी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे लसणाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. अनेकांचे पीक उध्वस्त झाले आणि आवक कमी आल्याने आता लसणाच्या या पिकांमध्ये मोठी वाढ झालेली दिसत आहे.

परंतु आता लसणाच्या या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झालेली दिसून येत आहे. लसूण खरेदी करणे सर्वसामान्यांना परवडत नाही. परंतु शेतकऱ्यांना मात्र याचा चांगलाच फायदा होत आहे. शेतकऱ्यांकडे यावर्षी लसणाचे उत्पादन कमी आहे. परंतु त्याला चांगला भाव भेटल्याने त्यांना फायदा होत आहे. परंतु आता शेतकऱ्यांचे हे पीक चोरीला जाण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

लसूण पिकाची चोरी | Garlic Rate

अशाच काही घटना मध्य प्रदेशात घडलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातून पिकांची चोरी झाली आहे. ही बातमी सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. हि बातमी कलालिया भागातील आहे. जहान येथील एका शेतकऱ्याने सांगितले की, मध्यरात्री काही लोकांनी त्याच्या शेतातील लसणाचे पीक चोरून नेले. त्यानंतर त्यांना काय करावे हे सुचलेच नाही, पुढच्या आठवड्यात बाजारात विकायची असलेली लसणाची ४ ते 5 पोती चोरून नेल्याचे शेतकऱ्याने सांगितले. लसणाच्या दरात मोठी वाढ झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले. बाजारातही भाव चांगला मिळतो. त्यामुळे आता लोक लसूण चोरून बाजारात विकत आहेत.

लसणाची ४० हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री

देशातील बाजारपेठांमध्ये ४० हजार रुपये प्रतिक्विंटल दराने लसूण विकला जात आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या ओडिशाच्या अलेश्वर मंडीमध्ये लसणाची सर्वाधिक किंमतीला विक्री झाली. त्याचप्रमाणे लसणाला ४० हजार रुपये क्विंटल भाव मिळाला.