Gas Cylinders| अनेक ठिकाणी आपण गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याच्या बातम्या ऐकत असतो. अलीकडेच किराडपुर भागात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्यामुळे आपण गॅस सिलेंडरच्या बाबत काळजी घेणे खूप गरजेचे आहे. परंतु हा स्फोट नक्की कशामुळे होतो? कसा होतो? हे माहिती असणे गरजेचे आहे. त्यानंतरच आपण त्याची काळजी घेऊ शकतो. अशा घटनांमध्ये सिलेंडरचा म्हणजेच टाकीचा नव्हे तर आतील गॅसचा स्फोट (Gas Cylinders) होऊन आग लागते. या प्रसंगांमध्ये गॅस गळती होणे हेच मुख्य कारण आहे.
गॅस सिलेंडरची (Gas Cylinders) टाकी फुटण्याच्या घटना अनेक ठिकाणी होतात. परंतु गॅस सिलेंडर वापरताना आपण योग्य प्रमाणात त्याची काळजी घेतली, तर ती दुर्घटना अपना टाळू शकतो. गॅस सिलेंडरमध्ये एलपीजी म्हणजेच लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस वापरण्यात येतो. हा गॅस सिलेंडरमध्ये पूर्णपणे बंद असतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी गोडाऊन मधून हा सिलेंडर बाहेर काढला जातो. त्यावेळी त्याच्याशी व्यवस्थित पॅक आहे की नाही याची देखील चौकशी केली जाते.
काय घ्यावी काळजी? | Gas Cylinders
गॅस सिलेंडर लीक झाल्यास घरातील दरवाजे खिडक्या उघड्या ठेवा. त्याचप्रमाणे त्या जाळाजवळ प्लास्टिकची वस्तू फेकू नका. स्वयंपाक कधीही लक्ष न देता अर्धवट सोडू नका. सिलेंडर जर तुम्ही वापरत नसाल तर रेगुलेटर बंद करा. आग लागल्यास घाबरून न जाता त्या सिलेंडरला ओले पोते लावा. यातून त्याला ऑक्सिजन भेटणार नाही आणि आगीची तीव्रता देखील कमी होईल लीकेजचा थोडा वास आल्यास रेग्युलेटर काढा, सीलला कॅप बसवा.
गॅस जर लिक होत असला आणि त्याचा एखाद्या ठिणगीशी थोडा जरी संबंध आला, तरी त्या सीलद्वारे सिलेंडरमधून गॅस बाहेर पडू शकतो. आणि आग लागू शकते. ज्या ठिकाणी रेगुलर लावण्यात येते, तेथे सील सुरुवातीच्या आगीमुळे वितळून तीच एक सिलेंडरमधील गॅसपर्यंत पोहोचते. त्यामुळे सिलेंडरमधील गॅस अति दाबाने बाहेर यायला सुरुवात होते आणि आग भडकते.
गॅस सिलेंडर बनवताना तो फुटू नये. यासाठी अनेक प्रकारे काळजी घेतली जाते. आणि त्या पद्धतीने ते बनवण्यात येते. जर गॅस टाकीची म्हणजे सिलेंडरची बॉडी लिकेज असेल, तर त्या स्फोटाची तीव्रता जास्त वाढते. गॅस लिकची अनेक कारण आहेत. परंतु ग्राहकांनी योग्य सुरक्षा घेतली, तर ही दुर्घटना आपण वाचवू शकतो