हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gas Lighter Repair) बऱ्याच घरांमध्ये ऑटोमॅटिक गॅस शेगडी वापरली जाते. त्यामुळे गॅस सुरु करताना लायटरची गरज लागत नाही. पण अजूनही अनेक लोक लायटरचा वापर करून गॅस सुरु करतात आणि मग जेवण बनवतात. अशा लोकांनी बऱ्याचदा अचानक लायटर खराब झाल्याची समस्या अनुभवली असेल. काही केल्या गॅस लायटर सुरु होत नाही आणि मग अशावेळी लायटर फेकून द्यायची पाळी येते. तुमच्यासोबत असं कधी झालंच तर लायटर फेकून देऊ नका. त्याआधी आम्ही तुम्हाला सांगतोय ती ट्रिक एकदा तरी वापरून बघाच.
तज्ञांच्या सांगण्याप्रमाणे, गॅस शेगडी पेटविण्यासाठी लायटर सर्वांत सुरक्षित पर्याय मानला जातो. बरेच लोक माचिसच्या काडीने गॅस पेटवतात किंवा ऑटोमॅटिक शेगडीचा वापर करतात. पण, हे काहीवेळा धोकादायक ठरु शकते. त्यापेक्षा नियमित लायटरचा वापर करून गॅस पेटवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, काझी कारणास्तव जर तुमचा लायटर अचानक खराब झाला तर? अशावेळी काय करायचे? लायटर फेकून द्यायचा? तर नाही. (Gas Lighter Repair) लायटर खराब होण्यामागे बरीच कारणे असतात. समजा तुमचा लायटर अचानक बंद झाला. तर तो फेकून देऊ नका. काहीवेळा तो वापरण्यायोग्य असतो. मात्र आपल्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे आपण लायटर फेकून देतो. अशावेळी काही युक्त्या वापरून तुम्ही लायटर पुन्हा वापरण्यायोग्य बनवू शकता. चला याविषयी जाणून घेऊया.
1. लायटर उन्हात ठेवा (Gas Lighter Repair)
बऱ्याचदा थंडी किंवा आर्द्रतेमुळे लायटर अचानक बंद पडण्याची शक्यता असते. अशावेळी लायटर थंड पडल्यामूळे नीट काम करत नाही. अशा परिस्थितीत एकतर लायटर उन्हात ठेवा किंवा मग एखाद्या गरम वस्तूच्या शेजारी ठेवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लायटर गरम करण्यासाठी त्याला चुकूनही थेट आगीत ठेवून गरम करण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते.
2. लायटर स्वच्छ करा
लायटर आपण रोज वापरतो. अशा परिस्थितीत सततच्या वापरामुळे लायटरमध्ये खूप घाण साचलेली असते. जीच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे लायटर खराब होऊन तो नीट पेटत नाही. अशा स्थितीत लायटर एकदा नीट स्वच्छ करा. (Gas Lighter Repair) लायटरमध्ये साचलेली घाण काढल्यानंतर कदाचित तो पुन्हा सुरळीत चालेल. यासाठी तुम्ही इअरबड्स वापर करू शकता. म्हणजे लायटरचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करता येईल.
3. लायटर अडकवण्यासाठी जागा
स्वयंपाक घरात लायटरचा वापर झाल्यानंतर त्याला योग्य जागी ठेवल्यास लायटर खराब होण्याची शक्यता कमी असते. बऱ्याच घरांमध्ये लायटर वापरून झाल्यावर तसाच ओट्यावर ठेवला जातो किंवा शेगडीवर ठेवला जातो. (Gas Lighter Repair) ज्यामुळे त्यात घाण साचते किंवा पाणी लागून लायटर खराब होऊ शकतं. त्यामुळे स्वयंपाकघरात लायटर व्यवस्थित योग्य जागी ठेवा. असे केल्यास तो जास्त दिवस चांगला राहील आणि वापरण्यायोग्य टिकेल. त्यासाठी स्वयंपाकघरात लायटर अडकवण्यासाठी जागा करा. म्हणजे धूळ, घाण, पाणी, मसाले यापासून त्याचे रक्षण होईल.
4. लायटरला पाणी लागून देऊ नका
बऱ्याचदा लायटरचा वापर करून झाल्यानंतर त्याला इकडे तिकडे ठेवलं जातं. (Gas Lighter Repair) ज्यामुळे लायटरला पाणी लागण्याची शक्यता असते. परिणामी लायटर लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळे लायटरला पाणी लागणार नाही याची काळजी घ्या.