Gas Tanker Blast : चाकण- शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! एक किलोमीटरपर्यंत हादरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट (Gas Tanker Blast) झाला आहे. या मार्गावर गँस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण स्फोट झाला असून या स्फोटामुळे एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला. गॅसच्या टँकरमधून चोरी सुरु असताना एका पाठोपाठ एक भीषण स्फोट झाले. मोहितेवाडी परिसरात रविवारी पहाटे ५ च्या सुमारास ही घटना घडली आहे. अचानक घडललेया या घटनेने एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात घरांची मोठी पडझड झाली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, चाकण-शिक्रापूर मार्गावरील मोहितेवाडी परिसरात एका ढाब्यासमोर हा गॅस टँकर उभा होता. त्याचवेळी टँकरमधून गॅस चोरीचे काम सुरु होत. गॅस चोरी करत असतानाच अचानक टॅंकरचा स्फोट झाला. या घटनेनंतर सदर चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. या स्फोटाचे हादरे जवळपास एक किलोमीटरपर्यंत बसले तसेच आगही लागली. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता कि नागरिकांमध्ये घबराट पसरली.

सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या आग नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे. टँकरमधून गॅस गळती झाल्यानं आग लागली आणि स्फोट झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत. गेल्या वर्षीही अशीच धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली होती. त्यामुळे गॅस तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.